आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:05 AM2023-04-18T11:05:29+5:302023-04-18T11:06:22+5:30

Karnataka  Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा यावेळेचा रंगच काहीसा वेगळा आहे. सत्तारूढ भाजपकडे नेतृत्व नाही; प्रमुख विरोधी पक्ष, कॉंग्रेसकडे नेतृत्वाची गटबाजी आहे. जनता दल हा आणखीन एक स्पर्धक दक्षिण कर्नाटकापुरता मर्यादित असला तरी सात-आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने क्षीण झाला आहे.

Today's Editorial - Karnataka shocks For BJP | आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

आजचा अग्रलेख : कर्नाटकी धक्के! शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

googlenewsNext

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा यावेळेचा रंगच काहीसा वेगळा आहे. सत्तारूढ भाजपकडे नेतृत्व नाही; प्रमुख विरोधी पक्ष, कॉंग्रेसकडे नेतृत्वाची गटबाजी आहे. जनता दल हा आणखीन एक स्पर्धक दक्षिण कर्नाटकापुरता मर्यादित असला तरी सात-आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने क्षीण झाला आहे. घराणेशाहीने डोके वर काढल्याने अनेक मतदारसंघात या तिन्ही प्रमुख पक्षांत अंतर्गत भांडणे वाढली आहेत. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सतत वाढत होती. त्याला ही निवडणूक "अपवाद ठरणार आहे. भाजपने दोनवेळा बहुमतासाठी काँग्रेस आणि जनता दलाच्या आमदारांना फोडण्यासाठी 'ऑपरेशन कमळ' नावाने मोहीमच राबिवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, कदाचित भाजपच्या पराभवास कारणीभूत ही ठरेल.

माजी मुख्यमंत्री आणि हुबळी-धारवाडचे सलग सहावेळा प्रतिनिधित्व करणारे जगदीश शेट्टर योनी चक्क कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसने राज्यातील २१२ उमेदवार घोषित केले असले तरी शेट्टर यांच्या हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. बंगळुरू येथे सोमवारी शेट्टर यांनी पक्षात प्रवेश केला आणि त्यांना लगेचच उमेदवारी देण्यात आली. गेल्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीदेखील तसेच केले. सवदी खास विमानाने बेळगावहून बंगळुरूला पोहोचले, नेत्यांशी चर्चा झाली. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा वगैरे सोपस्कार पूर्ण करून त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला आणि उमेदवारी फॉर्म घेऊनच परतले. काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस जनता दल आघाडीचे सरकार पाडण्यासाठी या दोन्ही पक्षांचे पंधरा आमदार फोडण्याची सूत्रे लक्ष्मण सवदी यांच्याच हाती होती. महाराष्ट्रात तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप- शिवसेना युतीचे सरकार होते. सुरक्षित आसरा शोधत काँग्रेसचे बारा आणि जनता दलाचे तीन आमदार घेऊन सवदी मुंबईत तळ ठोकून बसले होते. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपद बहाल करण्यात आले. फुटणाऱ्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील अथणीचे काँग्रेसचे आमदारही सहभागी होते. त्यांनीच लक्ष्मण सवदी यांचा पराभव केला होता. आता त्यांनाच उमेदवारी नाकारून आपणास द्या, अशी मागणी सवदी करीत होते. भाजपने त्याला नकार देताच पक्ष सोडून ज्या कॉंग्रेसचे सरकार पाडले त्याच पक्षात सवदींनी प्रवेश केला.

जगदीश शेट्टर यांचा राजकीय प्रवास संघ परिवारातील साधकासारखा आहे. व्यवसायाने वकील असलेले शेट्टर लिंगायत समाजाचे आहेत. तरुणपणी संघ तसेच अभाविपमध्ये काम करून भाजपमध्ये आले. सलग सहावेळा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. येडियुरप्पा आणि दिवंगत केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या बरोबरीने त्यांनी कर्नाटकात भाजपची उभारणी केली. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून पक्षश्रेष्ठींनी पायउतार व्हायला सांगितले तेव्हाच जगदीश शेट्टर यांची अपेक्षा होती पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठी देतील. मात्र, ही धारवाडचेच बसवराज बोम्मई यांना देण्यात आली. शेट्टर नाराज झाले. त्यांनी मंत्रिमंडळात काम करण्यास त्यांनी नकार दिला.

जनता दलात वाढलेल्या बसवराज बोम्मई यांचा विचार पक्षाने केला, हे शेट्टर यांना खटकले.  पक्षश्रेष्ठींच्या निर्णयासच आव्हान दिले गेले, अशी चर्चा त्य विरोधकांनी घडवून आणली. परिणामी उमेदवारी नाकारले आमदारांच्या यादीत त्यांचा (शेट्टर) समावेश झाला. भाजप आणि काँ २२४ पैकी प्रत्येकी २१२ उमेदवार जाहीर केले. मात्र, हुबळी-धारवाड या शेट्टर यांच्या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली नाही. संघ परिवारात घडलेले शेट्टर काँग्रेसमध्ये कधीही प्रवेश करणार नाहीत, हा भाजपचा विश्वास नडला. निवडणुका जाहीर झाल्यापासून असे अनेकांनी पक्षांतर केले आहे. भाजपने सुमारे सत्तावीस विद्यमान आमदारांना बदलण्य निर्णय घेतला आहे. यापैकी काहींनी काँग्रेस आणि जनता दलात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. काही मंत्र्यांना ही उमेदवारी नाकारली त्यांनी पक्षात न राहण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे शिमोग्याचे आम राहिलेले माजी उपमुख्यमंत्री ईश्वराप्पा यांनी राजकीय संन्यास घेण्य निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन चिरंजीव विजयेंद्र यास आपल्या शिकारी मतदारसंघातून उमेदवारी मिळविली. पक्ष, निष्ठा आदींना तडा देण् प्रशिक्षण देणाऱ्या आजपेला तडाखा बसत आहे शेहर यांच्या निर्णय उत्तर कर्नाटकावर परिणाम होऊ शकतो. शेवटी, जे पेरले, तेच उगवणार

Web Title: Today's Editorial - Karnataka shocks For BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.