रेल्वे प्रवास असुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 04:04 AM2017-05-18T04:04:19+5:302017-05-18T04:04:19+5:30

अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर रेल्वेने गारूड केले आहे. प्रवास करणे तर सोडाच, नुसती डोळ्यासमोरून जरी धडधडत गेली तरी आजही आपण तेवढ्याच कुतुहलाने

Train travel insecure? | रेल्वे प्रवास असुरक्षित?

रेल्वे प्रवास असुरक्षित?

Next

अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावर रेल्वेने गारूड केले आहे. प्रवास करणे तर सोडाच, नुसती डोळ्यासमोरून जरी धडधडत गेली तरी आजही आपण तेवढ्याच कुतुहलाने तिच्याकडे पाहतो. तिचे हे धडधडत जाणे कुठेतरी मनात भीतीचे कंपणे निर्माण करणारे असले तरी त्या तुलनेत तिचे दर्शन अधिक सुखदायक असते, हेही तितकेच खरे. झूक झूक झूक झूक आगीण गाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी.. असे गुणगुणत मामाच्या गावाला रेल्वेतून प्रवास करताना जो आनंद आपण अनुभवला, त्याची आजही आठवण आल्हाददायी असते. परंतु या धकाधकीच्या काळात मामाच्या गावाचा हा प्रवास मात्र कठीण होताना दिसतो आहे. आरक्षणापासून ते नियोजित स्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण प्रवासात जिवाची जी घालमेल चालू असते. पूर्वी हजार टक्के सुरक्षित वाटणाऱ्या रेल्वे प्रवासाबद्दल आता थोडी साशंकता निर्माण होत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. मराठवाड्यात गेल्या आठवड्यात ज्या काही दोन घटना घडल्या, त्या बघून प्रवाशांना सुरक्षितता देण्यास रेल्वे प्रशासन कमी पडत आहे की काय, असे उगाचच वाटू लागले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या परळी - हैदराबाद मार्गावरील सिमेंट सील पटाच्या २०० लोखंडी चाव्या काढून फेकल्याची घटना घडली होती. हा प्रकार की-मॅन अंशुमन कुमार यांच्यामुळे उघडकीस आला होता. त्यामुळे मोठा अपघात टळला. या चाव्या कोणी काढल्या? कधी काढल्या? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दहशतवाद-विरोधी पथक व रेल्वे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. दुसरी घटना थोडी वेगळी असली तरी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढणारी आहे. सिग्नलमध्ये बिघाड घडवून परभणी-औरंगाबाद मार्गावर नरसापूर-नगरसोल या रातराणीला लुटण्याचा प्रकार घडला. रेल्वे प्रवासात लूटमारीच्या अशा कितीतरी घटना घडत असतात. प्रवासी तक्रार करत नसल्यामुळे लूटमारीच्या घटनांचा आकडा कागदोपत्री कमी दिसतो आणि प्रशासनही आलबेलपणे वागते. घटनेनंतर चौकशीचे वेळीच निराकरण होत नसल्यामुळे प्रवाशांच्या विश्वासार्हतेलाही तडा जात आहे.

Web Title: Train travel insecure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.