देशाचे द्रोही व प्रेमी

By admin | Published: January 11, 2016 02:58 AM2016-01-11T02:58:31+5:302016-01-11T02:58:31+5:30

भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही,

Traitors and lovers of the country | देशाचे द्रोही व प्रेमी

देशाचे द्रोही व प्रेमी

Next

भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही, पण जन्माने भारतीय नागरिक असलेल्या आमीर खानला मात्र ती जाणवली, परिणामी आमीर खान देशद्रोही ठरत असेल तर सामी देशाचा परमप्रेमी देशभक्त ठरायला हरकत नाही. केन्द्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ या जाहिरात मोहिमेचा आमीर खान इतके दिवस प्रतिमादूत होता. त्याला आता तेथून हटविण्यात आले आहे. पण हटविले की त्याची मुदत संपली यावरून पर्यटन मंत्रालयात असलेला गोंधळ आधीच उघड झाला होता. हाच विषय संबंधित मंत्रालयाच्या संसदीय समितीत उपस्थित झाला तेव्हा आमीरच्या उच्चाटनाला इतके महत्त्व देण्याची गरज नाही कारण तो देशद्रोही आहे अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी उधळली. हे महोदय भोजपुरी सिनेमातले सुपरस्टार समजले जातात. म्हणजे त्यांचा आणि आमीरचा कुणबा एकच. एक बरे झाले, आमीरला जाणवलेल्या असहिष्णुतेचे प्रत्यक्ष दर्शन तिवारी यांनी घडविले. तिकडे तो वाद सुरू असताना इकडे मुंबईत आमीर आणि शाहरुख यांना मिळत असलेली मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यावरून माध्यमांंमधून मोठा गोंधळ सुरू आहे. या दोघांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात व्यक्त केलेली नापसंती सरकारला आवडली नाही म्हणून त्यांना ही शिक्षा असा माध्यमांचा सूर आहे. मुळात केवळ मुंबईतच नव्हे तर अन्यत्रही बड्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कामी येत असल्याने कायदा सुव्यवस्था अधिक धोक्यात येत चालली आहे व त्यामुळे ती कमी करावी अशी टीका माध्यमेच करीत असतात. त्यातून सिनेमा व्यवसायातील सर्व तारे-तारका त्यांच्या पदरी खासगी बाऊन्सर्सचा ताफा बाळगत असतात व त्यांच्या पुढ्यात आपले पोलीस बिचारे फारच किरकोळ भासत असतात. अशा स्थितीत केली सुरक्षा कमी तर त्यातून एवढा गहजब माजण्याचे किंवा माजवला जाण्याचे काही कारणच नाही.

Web Title: Traitors and lovers of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.