तिघी

By अोंकार करंबेळकर | Published: October 12, 2017 11:28 PM2017-10-12T23:28:57+5:302017-10-13T10:15:51+5:30

इंटरनेटवरल्या रंगीबेरंगी जगात  ट्रेण्डी आणि हॅपनिंग असणा-या तीन आज्जीबार्इंच्या शोधात केलेल्या भन्नाट भटकंतीची धम्माल कहाणी...

 Triple | तिघी

तिघी

googlenewsNext

इंटरनेटवरल्या रंगीबेरंगी जगात  ट्रेण्डी आणि हॅपनिंग असणा-या तीन आज्जीबार्इंच्या शोधात केलेल्या भन्नाट भटकंतीची
धम्माल कहाणी...
थिमक्का, नानम्मल, मस्तानम्मा. एरवीच्या आपल्या साध्यासरळ धुवट लुगड्यासारख्या आयुष्यात या तिघींनी एकेक असा भन्नाट धागा विणलाय, की ज्याचं नाव ते!
थिमक्का. वय वर्षे १०६.
- पोटी मूल नाही, तर वांझोटेपणाचा शिक्का नको म्हणून सत्तरेक वर्षांपूर्वी या बाईनं आपल्या गावाकडे जाणारा एक रस्ता निवडला, आणि त्याच्या दोन्ही कडांना वडाची झाडं लावायला घेतली. रोज किमान एक झाड लावायची. आणि कालपर्यंत लावलेली झाडं पोटचं मूल वाढवावं, तशा निगुतीनं वाढवत राहायची. असं गेली कित्येक वर्षे, रोज चाललंय.
वयाची शंभरी उलटली, तरी अजूनही रोज चाललंय. नानम्मल. वय वर्षे ९८.
या वयात आॅलिम्पिकमधल्या अ‍ॅथलिट्स असतात तशा चपळाईनं योगासनं करते ही आजीबाई.
आयुष्यभर योगासनं केली आणि दुस-यांना शिकवली. घरापलीकडचं जग पाहिलेलंच नाही.
गावाबाहेरचा एकच माणूस नानम्मलच्या चांगल्या ओळखीचा आहे - नरेंद्र मोदी!
जगभरातून पाच लाखांवर नातवंडांची आॅनलाईन फौज जमवणारी यू ट्यूबस्टार मस्तानम्मा. या आज्जींचं वय अवघं १०६. शेतात चूल पेटवून भसाभस चिरत-कापत-कांडत-कुटत रांधायच्या हटके स्टाईलमुळं पाच लाखांहून जास्त फॉलोअर्स मिळवणाºया आजीबाई यू ट्यूबवरून सगळ्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. मिचमिच्या डोळ्यांतून, गालांमध्ये हसत शेतात स्वयंपाक करणाºया या खमक्या बाईनं एकटेपणाची थोडीथोडकी नाही तर तब्बल आठ दशकं काढली आहेत. आणि गंमत म्हणजे यू ट्यूब म्हणजे काय याचा बार्इंना ठार पत्ता नाही!!!

-ओंकार करंबेळकर
२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये
प्रसिद्ध झाला. सर्वत्र उपलब्ध
तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com 
आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com  
नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा : 8425814112

Web Title:  Triple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी