चिंटू, पप्पा आणि जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:32 AM2017-12-15T05:32:42+5:302017-12-15T05:32:59+5:30

पप्पा, अहो तीच. जिचे फोटो तुम्ही पाहताना मी तुमच्याकडून पटकन प्रगती पुस्तकावर सही करून घेत होतो. तिची तीच जाहिरात. (पटकन जीभ चावतो)

Tux, Dupa and Advertising | चिंटू, पप्पा आणि जाहिरात

चिंटू, पप्पा आणि जाहिरात

Next

-संदीप प्रधान

(चिंटू हा पंधरा वर्षांचा मुलगा आहे. त्याचे पप्पा टी.व्ही.चा रिमोट घेऊन सर्फिंग करीत आहेत.)
चिंटू : पप्पा, काय शोधताय? ती जाहिरात का?
पप्पा : कोणती रे चिंटू?
चिंटू : पप्पा, अहो तीच. जिचे फोटो तुम्ही पाहताना मी तुमच्याकडून पटकन प्रगती पुस्तकावर सही करून घेत होतो. तिची तीच जाहिरात. (पटकन जीभ चावतो)
पप्पा : चिंटू, तू हल्ली फार तोंड वर करून बोलायला लागलायस. त्या तशा जाहिराती बंदच व्हायला हव्या होत्या. तुमची पिढी फुकट जाण्याची हल्ली भीती वाटू लागलीय.
चिंटू : पप्पा, टीव्हीवर जाहिरात बंद केली तरी सोशल मीडियावर आम्हाला बिघडवणाºया जाहिराती असणारच. त्या कशा बंद करणार?
ँँपप्पा : पण तू तर दिवसभर कार्टून नेटवर्क बघतोस ना?
चिंटू : पप्पा, दिवसभर कार्टून बघून बोअर नाही का होणार? मग मी सगळ बघतो. बर टॉम अँड जेरीपासून डोरेमॉनपर्यंत अनेक कार्टून मोठे आवडीनं बघतात म्हणून मोठ्यांच्या जाहिराती हल्ली आमच्या चॅनलवर दाखवतात.
पप्पा : काय बोलतोस काय? तू तर रात्री १० नंतर कार्टून चॅनल्स बघत असतोस.
चिंटू : पप्पा, तुम्हाला ती जाहिरात माहित्येय ना? ज्यात कामवाली कामावर येत नाही म्हणून मालकीण भडकते तर कामवाली म्हणते फेसबुकवर स्टेटस ठेवलं होतं. साहेबांनी लाईक केलं.
पप्पा : हो तर माहिती आहे.
चिंटू : आपल्या शेजारच्या कुलकर्णी काकांचे सेम टु सेम तसच झालं. काकू माहेरी निघून गेल्यात.
पप्पा : चिंटू, तू आईचा खबरी दिसतोयस
चिंटू : आणखी एक गरमागरम खबर देऊ. समोरच्या सिद्धार्थनी पास्ता खायला घालून वरच्या मजल्यावरची मॅनेजर पटवली होती. तो सगळ््यांना सांगत होता बना आपल्या किस्मतचा डायरेक्टर. गेली सहा महिने काहीच करत नव्हता. परवाच त्याची बायको सोडून गेली.
पप्पा : चिंटू... चिंटू अरे काय हे? अग ऐकलस का उद्यापासून केबल बंद करूया.
चिंटू : माझ्या मोबाईलवर सर्व अ‍ॅप्स आहेत पप्पा.

Web Title: Tux, Dupa and Advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.