पुनरावृत्तींनी भरलेला निरस संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:35 AM2018-08-16T06:35:11+5:302018-08-16T06:35:30+5:30

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल कि ल्ल्याच्या तटावरू न पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून आपल्या क ारकि र्दीचे पाचवे व अंतिम भाषण केले.

Uninterrupted dialogue filled with recurrences | पुनरावृत्तींनी भरलेला निरस संवाद

पुनरावृत्तींनी भरलेला निरस संवाद

Next

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल कि ल्ल्याच्या तटावरू न पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून आपल्या क ारकि र्दीचे पाचवे व अंतिम
भाषण केले. २०१४ सालच्या मोदींच्या पहिल्या भाषणात आक्रमक ता अन्नुक त्याच संपादन केलेल्या अभूतपूर्वविजयाचा जोश होता. देशाला वेगाने पुढे नेण्याची जिद्द होती. भारताच्या भाग्योदयाच्या अशा विविध संक ल्पनांचा मोदींनी त्यावेळी जो पुनरु च्चार केला, ती आश्वासने
लोक सभा निवडणुक ीच्या प्रचारात त्यांनी स्वत:च जनतेला दिली होती. त्यानंतर पुढल्या तीन स्वातंत्र्यदिनांच्या भाषणात आपल्या सरक ारच्या क ामक ाजाचेवर्णन ऐक वताना विरोधक ांवर प्रहार क रण्याचेसूत्र त्यांनी निवडले. मोदींच्या क ारकि र्दीत क्वचितच असे घडलेक ी, त्यांचे भाषण निवडणूक प्रचाराच्या धाटणीचे नव्हते. प्रत्येक वेळी लोक ांवर थेट प्रभाव टाक णारे विषय त्यांनी निवडले. तथापि, एव्हाना साऱ्या देशाने मोदींची चार वर्षांहून अधिक क ाळाची राजवट अनुभवली आहे. लाल कि ल्ल्यावरचे मोदींचे पाचवे संबोधन त्यादृष्टीने विशेष महत्त्वाचे होते. चार वर्षांच्या क ारकि र्दीचा लेखाजोखा सादर क रताना, मोदींनी भविष्यातील वेगवान विक ासाचे मंत्र तर ऐक वलेच, त्याचबरोबर सत्तेत क ायम राहण्याची त्यांची बेचैनी, व्याकुळता अन् आतुरताही शब्दाशब्दातून जाणवली. २०१३ विरु द्ध २०१८ अशा थाटात सारेसंबोधन सादर क रताना, विक ासाचा वेग क ायम राखायचा असेल तर सत्तेत आपल्या पुनरागमनाशिवाय देशाला पर्याय नाही, हेदेखील अप्रत्यक्षपणे त्यांनी सूचित क रू न टाक ले. आगामी निवडणुक ीत ईशान्य भारतात भाजपला बहुदा चांगलेयश मिळेल. साहजिक च ईशान्येक डील राज्यांचा त्यांनी वारंवार गौरवपूर्ण उल्लेख केला. तथापि, यंदा त्यांच्या संपूर्ण भाषणाचे नीट अवलोक न केलेतर क ायम आक्रमक आवेशात बोलणारे मोदी यावेळी अनेक मुद्यांवर बरेच बचावात्मक होते, असे जाणवले. गोहत्या तेगंगा स्वच्छता, पाकि स्तानपासून एनआरसीपर्यंत, दलितांवरील अत्याचारापासून जमावाच्या हिंसाचारा(मॉब लिंचिंग)पर्यंत, बेरोजगारांच्या नोक ºया व रोजगारापासून शेतक ºयांच्या आत्महत्यांपर्यंत, तमाम वादग्रस्त मुद्यांवर थेट भाष्य क रण्याचेत्यांनी टाळले. डॉलरच्या
तुलनेत रु पयाची वेगानेहोत असलेली घसरण, दक्षिण आशियात चीन व पाकि स्तानच्या संदर्भातील भारताची क मजोर स्थिती, अशा संवेदनशील विषयांना तर किंचित स्पर्शही त्यांनी भाषणात केला नाही. क ाश्मीरमधे राज्यपाल राजवट आहे. तिथे आघाडी सरक ारचे पतन घडवल्यावर, पंतप्रधानांना अचानक वाजपेयींचे क ाश्मीर व्हिजन आठवले. मुस्लीम समुदायाच्या उत्क र्षाचा क ोणताही मुद्दा त्यांच्या भाषणात नव्हता; केवळ तीन तलाक च्या मुद्यावर आपली क टिबद्धता जाहीर क रू न ते मोक ळे झाले. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचा, सर्जिक ल स्ट्राईक , रोजगारांच्या वाढत्या संधी इत्यादी मुद्यांचाही त्यांनी उल्लेख केला. तथापि, नीमक ोटेड युरिया, शौचालयांची निर्मिती, भ्रष्टाचाराला लगाम, सैनिक ांचा सन्मान, स्टार्टअप, स्टँड अप, मेक इन इंडिया, इज आॅफ डुर्इंग बिझिनेस यापैक ी एक ही मुद्दा त्यांच्या भाषणात नवा नव्हता. वाढत चाललेल्या महागाईबाबत तसेच क ाळ्या पैशांबाबत सरक ारचे प्रयत्न
कि तपत यशस्वी ठरले, याविषयी त्यांनी सूचक मौन पाळले. तब्बल ८२ मिनिटांचेभाषण त्यात ना नेहमीचेआक र्षण ना उत्साह. पंतप्रधानांचेसारे भाषण त्यामुळे अनेक पुनरावृत्तींनी भरलेला निरस संवाद होता. पंतप्रधानांची देहबोलीदेखील नेहमीपेक्षा यंदा क मजोर पडली. आपल्या शैलीनुसार क ाही शब्द अन् वाक्यांचा पुनरु च्चार क रताना, श्रोत्यांवर नेहमीचे गारु ड क ाही मोदींना जमवता आले नाही. खरंतर जनतेला नवनवी स्वप्ने विक ण्याची क ला मोदींना चांगलीच अवगत आहे; मात्र आज त्यांच्या क डचे शब्द त्यासाठी बहुदा अपुरेपडले.

Web Title: Uninterrupted dialogue filled with recurrences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.