UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 09:59 PM2024-07-01T21:59:53+5:302024-07-01T22:00:15+5:30
13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.
UPSC Prelims Results 2024 :केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) ने आज, 1 जुलै रोजी नागरी सेवा (प्रीलिम्स) परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. 13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात.
नागरी सेवा प्री परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार UPSC CSE Mains 2024 साठी पात्र असतील. मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि शेवटी अंतिम निकाल लागेल. परीक्षेच्या नियमांनुसार, सर्व पात्र उमेदवारांना नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2024 साठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल. अर्ज भरणे आणि सबमिट करण्याच्या तारखा आयोगाच्या वेबसाइटवर लवकरच जाहीर केल्या जातील.
UPSC प्रिलिम्स परीक्षा 16 जून रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.यंदाच्या परीक्षेद्वारे 1056 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवा, यांचा समावेश आहे. एकूण जागांपैकी 40 अपंगत्व श्रेणीतील व्यक्तींसाठी राखीव आहेत. UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.
असा पाहा UPSC प्रीलिम्स निकाल
स्टेप 1: सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
स्टेप 2: आता मेन पेजवर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा (प्री) निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना आवश्यक तपशील भरावा लागेल.
स्टेप 4: आता सबमिट पर्यायावर क्लिक करा आणि आता निकाल तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.
स्टेप 5: निकाल तपासा आणि भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.