मंगळावर पाणी.. ते दिसले कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:20 AM2020-10-01T02:20:11+5:302020-10-01T02:20:50+5:30
सायन्स मॅगझिन नेचर अॅस्ट्रोनॉमीमध्ये याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी मार्स एक्स्प्रेस या सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या गेल्या दहा वर्षांतील रडार इमेजेसचा अभ्यास केला.
मंगळावर जाऊन शोध घेताना अपघाताने एक अंतराळवीर तिथेच राहतो. तिथेच तो काही दिवस काढतोही. तिथे अन्नपदार्थही पिकवतो.. असा ‘द मार्शियन’ नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. त्याची जगभर चर्चाही झाली होती. आता एक नवा शोध लागला आहे. वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहावरील पाण्याचा स्रोत शोधून काढला आहे. तिथे जमिनीखाली तीन तलाव सापडले आहेत. यूरोपियन स्पेस एजन्सी स्पेसक्राफ्ट मार्स एक्स्प्रेसने २०१८ मध्ये बर्फाखालील खाऱ्या पाण्याचं सरोवर शोधलं होतं. याचेच ठोस पुरावे मिळवण्यासाठी २०१२ ते २०१५ पर्यंत मार्स एक्स्प्रेस सॅटेलाइट २९ वेळा या परिसरातून गेलं. त्याचे फोटो काढले.
सायन्स मॅगझिन नेचर अॅस्ट्रोनॉमीमध्ये याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी मार्स एक्स्प्रेस या सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या गेल्या दहा वर्षांतील रडार इमेजेसचा अभ्यास केला. त्यातून केवळ खाºया पाण्याचे तलावच नाही तर तिथे आणखी तीन सरोवर असल्याचेही दिसले. पण हे तिन्ही सरोवर प्रचंड प्रमाणात खारे असल्याने त्यात जीव असण्याची शक्यता कमी असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ज्या सॅटेलाइटच्या इमेजेसचा वापर यासाठी झाला ते मार्स एक्स्प्रेस सॅटेलाइन २००३ मध्ये झेपावले होते. तेव्हापासून ते तिथे घिरट्या घालत आहे.
तब्बल २० किलोमीटर रुंद सरोवर!
मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर २०१८ मध्ये शोधलेलं सरोवर बर्फाने झाकले गेले आहे. हे सरोवर साधारण २० किलोमीटर रुंद आहे. मंगळ ग्रहावर साडलेला पाण्याचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा स्रोत आहे.