हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:56 AM2018-10-16T05:56:56+5:302018-10-16T05:57:20+5:30

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ...

The weather forecast goes wrong because ... | हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

Next

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेहमीच उत्सुकतेची बाब असते.
आजमितीस जगभरात हवामान व पावसाचे अंदाज मिळवण्यासाठी सर्वत्र संगणकीय व्यवस्थेचा वापर होतो. अवकाशातील उपग्रहांद्वारे मिळालेली माहिती या संगणकांना पुरविली जाते. कोणताही संगणक त्यास दिल्या जाणाऱ्या प्रणालीनुसार कार्य करीत असतो. पृथ्वीवरील हवामान आधीच्या अनेक वर्षांत कोणत्या परिस्थितीत (कंडिशन्स) कसे होते, याची माहिती संगणकाला पुरवलेली असते. त्याआधारे व आताच्या हवामानाची स्थिती काय आहे, याचा तपशील संगणकाला मिळाल्यानंतर संगणक भविष्यातील हवामान व पाऊस कसे असेल याचा अंदाज व्यक्त करतो. परंतु आपला निसर्ग हवामानातील लहान बदलांबाबतही खूप संवेदनशील आहे. परिणामी, जर संगणकांची प्रणाली लिहिताना जर काही चूक झाली तर हवामानाचे अंदाज पण चुकणार आहेत.
निसर्गात एकाच वेळेला अनेक घटक कार्यरत असतात. कुठल्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवित असताना अनेकदा चुका होत असतात. उदा. समुद्राच्या पाण्याचे तापमान, त्यातून निर्माण होणारी वाफ, समुद्रातील हिमसाठा व अन्य घटक. दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याने पाण्याचे तापमान स्थिर राहत नाही. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण सतत वाढत आहे. परिणामी तापमानवाढ वेगाने होत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात जीवनास धोकादायक बदल होत आहेत. हे बदल संगणकाची प्रणाली तयार करताना त्यात समाविष्ट केलेले नाहीत. परिणामी, हवामानाचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. याचे उत्तम उदाहरण नुकत्याच अमेरिकेत आलेल्या मायकेल वादळाचे आहे. तेथे खूप प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असूनही, या वादळाची तीव्रता अचानक इतकी वाढली की नागरिकांना या वादळाच्या धोक्याची सूचना फक्त काही तासच आधी देण्यात आली. परिणामी, अजून २ हजार लोक घरांच्या ढिगाºयाखाली अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत १८ जण या वादळांत मरण पावले आहेत. तरी सुमारे ३० लाख लोकांनी स्थलांतर केले होते.
कार्बन वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडत नाही. परिणामी, पृथ्वीवरचे तापमान वाढते. या तापमानवाढीमुळे हवामानात झालेले बदल जीवनास हानिकारक आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण ३५० पेक्षा जास्त असणे हानिकारक असते. आताच हे प्रमाण ४१० पीपीएम एवढे झाले आहे. परिणामी, आताच आपण यावर सारासार विचार करत हवामानाचा अंदाज देताना प्रामुख्याने सर्व अंगाने विचार केला पाहिजे.

- शिरीष मेढी । पर्यावरणशास्त्र अभ्यासक

Web Title: The weather forecast goes wrong because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.