हा आठवडा मराठी खासदारांचा

By admin | Published: December 12, 2014 11:39 PM2014-12-12T23:39:34+5:302014-12-12T23:39:34+5:30

पूनम महाजन यांनी देशातील लुप्त होणा:या भाषा, लिपींचा प्रश्न उपस्थित सभागृहात करताना कानडी लेखक एस. एल. भैरप्पा यांच्या पुस्तकांचा उल्लेख केला.

This week's Marathi MPs | हा आठवडा मराठी खासदारांचा

हा आठवडा मराठी खासदारांचा

Next
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडणारे विषय कोणते आहेत, याचा शोध सध्या सर्वच खासदार घेताना दिसतात. या शोधात गंगा नदीवरील; तसेच कानडी लेखकांनी लिहिलेली पुस्तके मोदींना आवडतात, असे लक्षात आले आहे. पूनम महाजन यांनी देशातील लुप्त होणा:या भाषा, लिपींचा प्रश्न उपस्थित सभागृहात करताना कानडी लेखक एस. एल. भैरप्पा यांच्या पुस्तकांचा उल्लेख केला. त्यांचे भाषण एवढे दज्रेदार होते, की अख्खे सभागृह टाळ्या वाजवत होते. लोकसभा अध्यक्षांनी त्यांचे ‘अप्रतिम’ या शब्दात कौतुक केले. तर मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ‘बहोत खूब’ अशा शब्दात त्यांना शाबासकी दिली. यावेळी इराणी यांनी भैरप्पा यांना ‘राष्ट्रीय प्रोफेसर’ नेमण्यात येत असल्याची घोषणा केली. भैरप्पांचे ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात असल्यामुळे ते नरेंद्र मोदी यांचे आवडते लेखक असल्याचे लक्षात आले.
भंडा:याचे खासदार नाना पटोले यांनी ‘गंगेच्या स्वच्छतेचा’ प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. ज्यावेळी पटोले यांनी तो मांडला, तेव्हा सभागृहात कमालीचा गोंधळ सुरू होता. गंगेचा प्रश्न पुकारताच, लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी, गंगा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तेव्हा शांत राहा, असे म्हणत पटोलेंना चर्चा सुरू करण्यास सांगितले.  नानांनी ‘ जिस देश में गंगा बहती है, उस देश के हम वासी है.’असे म्हणत आणि एका वाक्यात दोनवेळा पंतप्रधानांचा हवाला देत चर्चेत गांभीर्य निर्माण केले. गंगा विकासमंत्री उमा भारती यांनी या चर्चेला उत्तर दिले, तेसुद्धा पंतप्रधान मोदींचे प्रयत्न कसे जोरकस आहेत, ते सांगत. 
महाराष्ट्रातील खासदार संसदीय आयुधांचा वापर करून सभागृहात प्रश्न मांडतात; पण त्यांचा आवाज फार घुमताना दिसत नाही. राष्ट्रीय प्रश्नावर राजीव सातव वेलमध्ये घोषणा देताना दिसले, तर राज्यातील दुष्काळाच्या मुद्दय़ावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सभात्याग केला. महाराष्ट्राचा दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, अशी जोरदार मागणी करून लोकसभाध्यक्षांना यावर चर्चा घेण्यासाठी भाग पाडणारे भाजपाचे नाना पटोले या आठवडय़ाचे हीरो होते. शिवसेनेचे खासदार महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर इतके गारठले आहेत की, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबादला नेण्याच्या मागणीवर त्यांनी साधा विरोधही नोंदवला नाही. मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्याला मात्र ते बारिक आवाजात सभागृहाबाहेर विरोध करतात; पण सभागृहात अवाक्षरही बोलत नाहीत. शिवसेनेच्या भावना गवळी व शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ज्येष्ठत्व नाकारून त्यांना मागच्या बाकावर व त्यातही नव्या सदस्यांसोबत बसविण्यात आले होते. त्यावरून काही दिवस सुंदोपसुंदी चालू होती, एकदिवस दोघेही तीन बाके पुढच्या आसनावर आले आणि विषय थंडावला. रावसाहेब दानवे, हंसराज अहीर या राज्यमंत्र्यांना या सत्रत अजूनर्पयत बोलण्याची संधीच मिळू शकलेली नाही. 
खा. राजू शेट्टी यांनी देशात दूध पावडरचे दर पडल्याने महाराष्ट्रात दररोज 3क् लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. अशावेळी दुधउत्पादकांना आधार देण्यासाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, हा मुद्दा मांडला तेव्हा कर्नाटक, पंजाब, आंध्रचे खासदार शेट्टींच्या बाजूने उभे राहिले. पण याचवेळी एक विरोधाभास बघायला मिळाला, लष्करात भरती करताना काही राज्यांचा कोटा पूर्ण भरला जात नाही, त्या जागांवर अन्य राज्यातील उमेदवार न भरता त्याच राज्याचे प्राधान्य असावे, असा मुद्दा संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्या समक्ष चर्चेला आला. यावेळी अनेक सदस्य प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करीत होते; पण महाराष्ट्रातील सारेच या विषयावर गार असल्याने आश्चर्य वाटले. लोकाधिकाराचा पुरस्कार करणारी शिवसेना तर कोठे गहाळ होती, ते कळलेच नाही. महाराष्ट्राच्या कोटय़ातील हजारो जागा लष्करात रिक्त आहेत, त्याचा पत्ता यानिमित्ताने लागला, पण बोलले कोणीच का नाही हे कळले नाही. 
सुप्रिया सुळे यांना राज्याच्या विषयात फारसा रस दिसत नसला, तरीही त्यांनी दुष्काळाच्या 
मुद्यावर सरकारला धारेवर धरले. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांनी सभागृहाबाहेर बैलगाडीची र्शयत व शिराळ्याची 
बंदी घातलेली नागपंचमी हे मुद्दे लावून धरले, तेसुद्धा भाजपाच्या मंत्र्यांना सोबत घेऊन! पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यती सुरू होतील, असे जाहीर केले. र्शयतीसाठी जे बैल उपयोगात येतात त्यांना शेतकरी अपत्याप्रमाणो जपतात, शेतीची फार कामे दिली जात नाहीत, कष्ट करून घेतले जात नाहीत, जनतेच्या भावना 
या शर्यतीशी जोडल्या गेलेल्या आहेत, अशा शब्दांत हा विषय महाडिक, विजयसिंह मोहिते पाटील व सुप्रिया सुळे यांनी जावडेकरांना पटवून दिला. 
महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हा विषय मांडण्याची संधी भाजपाने गमावल्याने पक्षाच्या अनेक खासदारांनी जावडेकरांच्या या निर्णयावर दातओठ खाल्ले खरे, पण सा:यांचाच नाईलाज होता. नागपंचमीचा विषय श्रद्धा व अंधश्रद्धेसह निसर्गमित्रंच्या जिव्हाळ्याचा असल्याने त्यावर निर्णय घेताना जावडेकरांना  तारेवरची कसरत करावी लागेल. 
 
 रघुनाथ पांडे
विशेष प्रतिनिधी, 
लोकमत समूह, नवी दिल्ली

 

Web Title: This week's Marathi MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.