जिनपिंग यांच्या भेटीने साधले काय?
By admin | Published: October 1, 2014 01:38 AM2014-10-01T01:38:13+5:302014-10-01T01:38:13+5:30
भारताच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा भाग टिंब टिंब रेषांनी दाखवला आहे. याचा अर्थ हा प्रदेश वादग्रस्त भाग असल्याचे सुचवायचे आहे.
Next
>भारताच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा भाग टिंब टिंब रेषांनी दाखवला आहे. याचा अर्थ हा प्रदेश वादग्रस्त भाग असल्याचे सुचवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून हे झाले असावे असे माङो मन म्हणते. हा चौकशीचा विषय आहे. सीमावाद सोडवायची चीनची तयारी असेल तर अरुणाचल प्रदेशला एक वादग्रस्त भूप्रदेश म्हणून दाखवायची आपली तयारी आहे, असे चीनचे भारतात आलेले अध्यक्ष शी जिनपिंग यांना सुचवण्याचा बहुधा मोदींनी प्रय} केला असावा. बीजिंगला परतल्यानंतर अशी बातमी आली, की जिनपिंग यांनी आपल्या लष्करी अधिका:यांना प्रादेशिक युद्धाला तयार राहायला सांगितले आहे. चिनी अध्यक्षाचा इशारा भारताकडे होता. पण का कुणास ठाऊक, भारताने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. कुठल्याही शब्दात भारताने आपली नाराजी व्यक्त केली नाही. गुलाम देशही असे वागत नाहीत. मग भारत असा का वागला?
मुळात चीनच्या अध्यक्षाला आपण भारतभेटीला बोलावलेच कशाला याचे मला आश्चर्य वाटते. त्यांना बोलावण्यासारखे काहीही घडले नव्हते. तयारीत नसलेल्या भारतावर 1962 मध्ये चीनने हल्ला चढवला. त्याबद्दल पश्चात्तापाचे दोन शब्दही चीनने अजून काढले नाहीत. त्या वेळी भारतीय हद्दीत घुसून बळकावलेला प्रदेशही चीनने अजून सोडलेला नाही. शी जिनपिंग यांना आमंत्रण देण्याआधी परराष्ट्र मंत्रलयाने स्थितीचा अभ्यास करायला हवा होता. व्हिसा, पासपोर्टपासून तो गिलगिट-बाल्टीस्तानमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची जमवाजमव या सा:या भारताला चिडवणा:या गोष्टी आहेत. स्वत:च्या ताकदीचा चीनला गर्व झाला आहे. भारत आज अस्ताव्यस्त आहे. त्यामुळे चीन स्वत:ला हवे ते दबाव टाकून मिळवू इच्छितो. भारत हे केव्हा ओळखणार?
श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या आपल्या शेजारी देशांमध्ये चीन शिरकाव करू पाहतो आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. चीनच्या दबंगगिरीने अनेक देश त्रस्त आहेत. भारताने त्या देशांशी संवाद साधला पाहिजे. तैवान, व्हिएतनाम आणि इतर दक्षिण आशियायी देशांशीे भारताने संपर्क वाढवला पाहिजे. त्या देशांना विश्वासात घेतले पाहिजे. तिबेटवरील चीनचे आधिपत्य मानले तरी तिथे तुमची दडपशाही सहन केली जाणार नाही असा संदेश चीनला दिला पाहिजे. दलाई लामा आधीच अशांत आहेत, तणावात आहेत.
जवाहरलाल नेहरूंनी 1962 मध्येच भारताला या धोक्यापासून सावध केले होते. नेहरू म्हणाले होते, ‘‘जमिनीवरून आमचे चीनशी भांडण आहे असे समजणो भाबडेपणा होईल. भांडणाची कारणो वेगळी आहेत. एका विशाल सीमेवर आशियाचे दोन मोठे देश समोरासमेार ठाकले आहेत. त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत. सीमेवर आणि आशिया खंडात या दोघांमध्ये कोण वरचढ आहे ही याची परीक्षा आहे.’’
चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा अनादर करण्याची माझी इच्छा नाही. पण त्यांची भारतभेट फसणारच होती. या भेटीत चीनने भारतात गुंतवणुकीचे अनेक करार केले. ही गुंतवणूक म्हणजे भारतीय हद्दीत घुसखोरीने उठलेल्या जखमांवर फुंकर मारण्यासारखे आहे. त्यांच्या भेटीचा उद्देश मला कळला नाही. मग त्या भेटीचे कौतुक करणो दूर राहिले.
दिल्लीत चीनचे अध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी बोलणी करीत असताना तिकडे लडाखमध्ये घुसखोरी करणो यामध्ये चीनचा अडेलतट्टपणा दिसतो. चीन भारतामध्ये 1क्क् अब्ज डॉलर गुंतवणार असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. नंतर हा आकडा 2क् अब्ज डॉलर्सवर आला. चीन भारतात पैसा लावतो आहे कारण त्याला आपल्याशी व्यापार वाढवायचा आहे. त्यात त्याचा आर्थिक फायदा तर आहेच, पण इतरही फायदे आहेत. पण मूळ गरजेचे काय? मूळ गरज आहे दोन देशांतील परस्पर विश्वास. त्या विश्वासाचे काय? चीनचे पंतप्रधान चौ एन लाय सुरुवातीला जगाला ठाऊक नव्हते. नेहरूंनी त्यांना जगापुढे आणले, जगाची ओळख करून दिली. मतलब होता तोर्पयत चौ एन लाय नेहरूंचा आदर करीत होते. स्वार्थ पूर्ण होताच चीन फुत्कार टाकू लागला. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ असे नारे तेव्हा लागायचे. चीनबद्दल भारत बिनधास्त होता. चीन आपल्याशी युद्ध करेल ही बाब भारताने स्वप्नातही अपेक्षिली नव्हती. पण चीनने विश्वासघात केला. नेहरू आणि चौ एन लाय यांच्यात जसे संबंध होते तसे मोदी आणि जिनपिंग यांच्यात निर्माण होऊ शकतील असे मला वाटत नाही. मैत्रीचे नाते असतानाही चौ एन लाय यांनी त्यांच्या मनात होते तेच केले. आता मोदी आणि जिनपिंग यांच्यात बोलणी सुरू असताना घुसखोरी करून चीनने पुन्हा एकदा दुष्ट हेतू प्रगट केला. सीमावादावर आपण फार ऐकायला तयार नाही हे चीनने दाखवून दिले.
उच्च पातळीवर मला संकल्पाचा अभाव दिसतो. स्वप्नरंजन सुरू असते. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या भेटीनंतर सीमा प्रश्नातील गुंतागुंत अधिक वाढली आहे. चिनी सैनिक भारतीय हद्दीत तळ देऊन केवळ थांबलेले नाहीत तर त्यांचे बळही वाढले आहे. नंतर हे सैनिक निघून गेले हे खरे. पण वादग्रस्त भूभागापासून दूर राहा हा संदेश चीनने अधिक मोठय़ाने ओरडून आपल्याला दिला. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीतून काय मिळाले, या चर्चेने काय फायदा?
कुलदीप नय्यर
ज्येष्ठ स्तंभलेखक