जो होगा, वह अच्छा ही होगा...
By अतुल कुलकर्णी | Published: July 18, 2018 12:33 AM2018-07-18T00:33:51+5:302018-07-18T00:34:10+5:30
आपण गीता शाळेत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले अभिनंदन.
प्रिय विनोदजी,
आपण गीता शाळेत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले अभिनंदन. पण त्यामुळे आमच्या शाळेत गोंधळ सुरू झालाय. आमच्या शाळेत जे घडलं त्याचा रिपोर्ट पाठवत आहे. योग्य ते मार्गदर्शन करावे.
आपलाच, मुख्याध्यापक
प्रार्थनेची वेळ होती. सगळे विद्यार्थी एका रांगेत होते. काही पोरं उशिरा आली. त्यामुळे मास्तरांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यातून बाचाबाची झाली. जे घडले ते असे -
- काय रे, ही काय वेळ झाली का यायची? प्रार्थना कोण करणार? तुझा...
- मास्तर, थेट बा वर जायचं नाही. आम्ही प्रार्थनेवर नाही तर गीतेवर विश्वास ठेवतो. समजलं का?
- अरे पण अशानं तुम्ही तुमचं मेरिट गमावून बसाल. तुमचं वर्ष वाया जाईल.
- मास्तर, जो हुआ, वह अच्छा हुआ।
जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है।
जो होगा, वह भी अच्छा ही होगा।
त्यामुळे उगाच चिंता करू नका. आमचं आम्ही बघून घेऊ.
- अरे पण तुमचे मार्क कमी होतील त्याचं काय? नापास झाला तर वर्ष वाया जाईल.
- मास्तर, तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्या लाये थे, जो तुमने खो दिया?
- कानाखाली आवाज काढीन. अरे, जन्मदात्या आईबापाचा तरी विचार कर...
- मास्तर, तुमने क्या पैदा किया था, जो नाश हो गया? न तुम कुछ लेकर आए, जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहीं पर दिया। त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका.
- अरे, पण अशाने वय वाढेल, वर्ष वाया जाईल. हातात काहीही उरणार नाही. मग काय कराल. बसाल हातावर हात ठेवून...
- मास्तर, का एवढी चिंता करू लागले. खाली हाथ आये, खाली हाथ चले। जो आज तुम्हारा है, कल किसी और का था, परसों किसी और का होगा। त्यात काय एवढं...?
- अरे बाबा पण तुझ्या घरचा विचार कर... नातेवाईक काय म्हणतील...?
- गीतेत काय लिहिलयं मास्तर, माहितीयं का? कुणी कुणाचा नातेवाईक नाही, कुणी कुणाचा सगा नाही, आता जास्ती डोकं खाल्लं तर गोळी खायला तयार व्हा मास्तर...
- अरे पण मी तुम्हाला लहानपणापासून शिकवलंय. तुमचा अभ्यास घेतलाय...
- मास्तर आत्मा अमर आहे असं लिहिलयं. तेव्हा तुम्ही काय चिंता करू नका. तुम किससे डरते हो? कौन तुम्हे मार सकता है? आत्मा ना पैदा होती है ना मरती है। तेव्हा गोळी खाल्ली तर फरक पडणार नाही मास्तर.
- अरे पण अशानं मी मरून जाईन.
- मास्तर, जिसे तुम मृत्यु समझते हो, वही तो जीवन है।
- जास्ती बोलू नकोस बाळा. अरे, माझं शरीर नष्ट होईल. मला तुझ्यासारखी लेकरं आहेत रे सोन्या...
- मास्तर, ना यह शरीर तुम्हारा है, ना तुम शरीर के हो। परंतु आत्मा स्थिर है फिर तुम क्या हो?
अरे पण गीतेत असं नाही सांगितलं, कर्म करत राहा, फळ मिळेल असे लिहिलयं...
- खरंय मास्तर. जो कुछ भी तू करता है, उसे भगवान को अर्पण करता चल। आता मी जे काही करेन ते त्यालाच अर्पण करेन.
प्रकरण आम्ही थांबवलं आहे. पण पुढे काय करायचे ते उलटटपाली कळवा.