शेतात जेव्हा वीज पिकते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:44 PM2017-10-08T23:44:27+5:302017-10-08T23:44:46+5:30
जगातील पहिली ‘सहकारी सौरऊर्जा उत्पादक संस्था’ सुरू करून शेतात पिकवलेली वीज विकणा-या गुजरातमधल्या धुंडी इथल्या शेतक-यांची जबरदस्त कहाणी
जगातील पहिली ‘सहकारी सौरऊर्जा उत्पादक संस्था’ सुरू करून शेतात पिकवलेली वीज विकणा-या गुजरातमधल्या
धुंडी इथल्या शेतक-यांची जबरदस्त कहाणी धुंडी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातलं तीनेकशे उंब-यांचं छोटंसं खेडं.
गावात कोणाकडेच मोठी शेती नाही. कोणी श्रीमंत नाही. बहुतेकांकडे दोन-तीन एकर शेती. पण याच गावातल्या काही शेतक-यांनी एकत्र येऊन एक जगावेगळं पीक आपल्या जमिनीच्या तुकड्यांवर लावलं आहे. त्याला बियाणांची, खतांची, कीटकनाशकांची, मजुरांची कसलीच गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, पुराचा फटका बसत नाही, रोगराईनं हे पीक मरत नाही. दुष्काळही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. उलट दुष्काळ उत्तम. अंग भाजून काढणारं ऊन या पिकाला भलतं मानवतं. धुंडीच्या शेतकºयांनी लोखंडी खांब रोवून वर टांगलेल्या या अनोख्या शेतीमध्ये भारतीय शेतकºयांचं नशीब बदलण्याची जादू आहे.
धुंडीतील अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?- तर वीज! सौरऊर्जा. स्वत:च्या वापरापुरती वीज
सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे, पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी सहकारी
तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं आणि जगातलंही पहिलं गाव आहे.
२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये प्रसिद्धी : दिवाळीच्या पणत्या अंगणात लागण्याच्या कितीतरी आधी!
तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com
आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com
नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा : 8425814112