नोकरीच्या संधीतील भूमिपुत्र ; स्मार्ट सिटीत होतोय ‘पराधीन’....! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 03:10 PM2019-02-02T15:10:33+5:302019-02-02T16:52:38+5:30

दरवर्षी हे तरुण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील फुटपाथवर रात्र काढतात व सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालयाचा दरवाजा उघडल्यावर आत जातात़...

When the state person searching job opportunity but depend in the smart city 'Paradhin' ....! | नोकरीच्या संधीतील भूमिपुत्र ; स्मार्ट सिटीत होतोय ‘पराधीन’....! 

नोकरीच्या संधीतील भूमिपुत्र ; स्मार्ट सिटीत होतोय ‘पराधीन’....! 

Next
ठळक मुद्देउपाशी पोटी ते आपली शारीरिक क्षमता कशी सिद्ध करणार आणि परीक्षेला पात्र ठरणार

- विवेक भुसे- 
काही दिवसांपूर्वी सदर्न कमांडच्या वतीने रेसकोर्स मैदानावर सैन्य भरतीचा कार्यक्रम आखण्यात आला होता़. काहीशे जागांसाठी हजारो तरुण राज्यभरातून पुण्यात आले होते़. कडाक्याच्या थंडीत त्यांनी रात्र रस्त्यावर काढावी लागली़. सकाळी परीक्षेला जाण्यापूर्वी अनेकांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता़. अशा अवस्थेत ही तरुण मुले अशी आपला उत्कृष्ट परफॉमर्न्स कसा सादर करणार.. याचा विचारच कोणी करत नाही़. याची माहिती मिळाल्यावर काही सामाजिक संस्थांनी त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केली होती़.  
यावर्षी २०१९ अखेरपर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण पोलीस, लोहमार्ग पोलीस दलासाठी ९०० पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहे़. तसेच राज्य राखीव दलासाठी १०० पदे भरण्यात येणार आहे़. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे़. या परीक्षांसाठी राज्यभरातून हजारो उमेदवार पुण्यात येतील़. दरवर्षी हे तरुण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील फुटपाथवर रात्र काढतात व सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालयाचा दरवाजा उघडल्यावर आत जातात़. त्याचबरोबर अनेक परीक्षांसाठी राज्य तसेच परराज्यातून तरुण-तरुणी पुण्यात नेहमी येत असतात़. त्यांच्याच्या सोयीसाठी काही कायमस्वरुपी सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न पुण्यासारख्या स्मार्ट शहरात होणे गरजेचे आहे़. 
शहरात अनेक ठिकाणी बेघर निवासा तयार करण्यात आला आहे़. राज्यभरातून आलेल्या या तरुणांना याठिकाणी एक रात्र काढण्याची सोय करता येईल़. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे़. भूमिपुत्रांना नोकरीत संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा सर्वच पक्ष करत असतात़. पण, त्यादृष्टीने कोणीही पावले उचलत नाही़ अशा परीक्षेच्यावेळी राज्यभरातून आलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे शहरातील एस टी स्टँड, रेल्वेस्थानकावर या संघटनांनी मदत केंद्र उभारावे़. अनेकांना पोलीस मुख्यालय अथवा परीक्षा केंद्र नेमके कोठे आहे व तेथे कसे जाता येईल याची माहिती नसते़. शहरात अनेक संस्थांमार्फत लोकांना दररोज मोफत अन्नदान करण्यात येते़. अशा संस्थांच्या सहकार्याने या मदत केंद्रावर मार्गदर्शन व आलेल्या तरुणांना एक फुड पॅकेज दिले तर त्यांची चांगली सोय होऊ शकेल़. 
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस सहआयुक्त अशोक धिवरे यांनी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट संघटनेच्या मदतीने पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या शारीरिक परीक्षेच्या वेळी त्यांच्या नाश्त्याची सोय करुन दिली होती़. आताही असा प्रयत्न करता येऊ शकतो़. ग्रामीण भागातून नोकरी मिळविण्यासाठी येणारे हे तरुण गरीब घरातून आलेले असतात़. त्यांच्याकडे अनेकदा एकवेळच्या जेवणासाठीही पैसे नसतात़. अशावेळी उपाशी पोटी ते आपली शारीरिक क्षमता कशी सिद्ध करणार आणि परीक्षेला पात्र ठरणार याचा विचार सर्वांनी करायची गरज आहे़. 
शहरातील संस्थांनी एकत्र येऊन शहरात परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या एक दिवसाच्या राहण्याची, बाथरुम व अंघोळीची सोय तसेच चहा नाश्त्याची सोय करण्याची जबाबदारी घेतली तर या उमेदवारांना आपली शारीरिक क्षमता सिद्ध करुन नोकरीसाठी प्रयत्न करता येईल़. स्मार्ट शहरातील जबाबदार नागरिक म्हणून ही सर्वांचीच जबाबदारी आहे़.

Web Title: When the state person searching job opportunity but depend in the smart city 'Paradhin' ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.