जोश आहे की नाही...! ‘आहे ना सर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:12 AM2019-01-20T04:12:22+5:302019-01-20T04:12:54+5:30

डॉ. गोपाळराव देशमुख मार्गावरचा फिल्म्स डिव्हिजनचा जुनाट परिसर... वातावरणात नवीन तजेला... एरव्ही सिनेमापेक्षा सरकारी फायलीसदृश गोष्टीची लगबग असलेल्या या परिसराला शनिवार दुपारपासूनच एक वेगळाच रंग चढला होता.

Whether Josh is there ...! 'Haha na sir' | जोश आहे की नाही...! ‘आहे ना सर’

जोश आहे की नाही...! ‘आहे ना सर’

Next

मुंबई : डॉ. गोपाळराव देशमुख मार्गावरचा फिल्म्स डिव्हिजनचा जुनाट परिसर... वातावरणात नवीन तजेला... एरव्ही सिनेमापेक्षा सरकारी फायलीसदृश गोष्टीची लगबग असलेल्या या परिसराला शनिवार दुपारपासूनच एक वेगळाच रंग चढला होता. निमित्त होते भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनाचे आणि तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.
यजमान असलेले केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांची लगबग सुरू होती. मनोज कुमार, आशा भोसले, जितेंद्र, रणधीर कपूर, रमेश सिप्पी, आमिर खान, ए.आर. रहमान, बोनी कपूर, परिणिती चौप्रा यांचे स्वागत झाले आणि मग आगमन झाले, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. त्यांच्यासोबत राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, प्रसून जोशी आदी मंडळी होती.
मोदी यांनी संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर संपूर्ण संग्रहालय फिरून पाहिले. गांधी आणि सिनेमा यावरील प्रदर्शनात त्यांनी विशेष रस दाखविला. संग्रहालयात ठेवण्यात आलेली जुनी सामुग्री त्यांनी आवर्जून पाहिली आणि मग ते नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रेक्षागृहात उपस्थितांशी संवाद साधण्यासाठी दाखल झाले.
सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहे, असे सांगत भारतीय चित्रपट संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही काळाजी गरज आहे. ते करण्यासाठी हे संग्रहालय महत्त्वाचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हागणदारी मुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण आदी विषयांसह सामाजिक विषयांवरही सिनेमे तयार होत असून, त्यांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभत आहे, असे निरीक्षणही मोदी यांनी नोंदविले.
सिनेमा चित्रीकरणासाठी लागत असलेल्या परवानग्या लवकरच एका वेब पोर्टलवर मिळणार आहे, तसेच दाओसमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेच्या धर्तीवर, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद घेण्याचा विचार सरकार करत असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
पंतप्रधानांनी उपस्थितांमधील सिनेमाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, त्यांना ‘काय जोश आहे की नाही....’ असे विचारले आणि त्याला ‘होय सर...’ असा प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावरील कार्यक्रम संपल्यावर मोदी आवर्जून सिनेसृष्टीतील बुजुर्गांची विचारपूस करण्यासाठी खाली उतरले आणि मनोज कुमार, आशा भोसले, किरण शांताराम आदींशी संवाद साधत त्यांनी उपस्थितांचा निरोप घेतला.

Web Title: Whether Josh is there ...! 'Haha na sir'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.