फूस कोणाची?

By admin | Published: March 28, 2016 03:37 AM2016-03-28T03:37:56+5:302016-03-28T03:37:56+5:30

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिस ही केवळ बहुराष्ट्रीय दहशतवादी संघटना राहिली नसून ती व्यापक व्यूहरचनेच्या बळावर तसेच सोशल मीडियाच्या

Who is the pallet? | फूस कोणाची?

फूस कोणाची?

Next

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया अर्थात इसिस ही केवळ बहुराष्ट्रीय दहशतवादी संघटना राहिली नसून ती व्यापक व्यूहरचनेच्या बळावर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरणारी एक विखारी संघटना म्हणून समोर आली आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला धमकी देण्यापर्यंत मजल जर ही संघटना गाठत असेल तर यावरूनच तिची ताकद आणि व्यापक संघटनाचा अंदाज बांधता येऊ शकतो. सीरिया आणि इराकमधील मोठ्या शहरांवर ताबा मिळविल्यानंतर आता तिची पाळेमुळे भारताच्या मातीपर्यंत पसरत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होऊ लागले आहे. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे परदेशातील लोक येथे मोठ्या संख्येने येतात. त्यात युरोप, अमेरिका आणि रशियातील पर्यटकांचे प्रमाण अधिक असते म्हणून गोवा आता इसिसच्या हिटलिस्टवर असल्याच्या वृत्ताला तेथील पोलीस मुख्यालयातील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे केवळ गोवा येथेच सतर्कतेचे इशारे देऊन भागणार नसून देशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी सावध राहणे तेवढेच गरजेचे बनले आहे. धुळे येथील सहा युवक इसिसच्या संपर्कात आल्याने पोलिसांकडून त्यांचे मतपरिवर्तन केल्याची घटना ताजी असताना आणि मुंबईतील दोघे जण इसिसच्या वाटेवरून परतले असताना सीरियाला जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी सात जणांनाही एटीएसकडून रोखण्यात आले. इसिसमध्ये जाणाऱ्या मुंबईतील दोघांनीच या सात जणांबद्दल माहिती दिल्याने व त्यांना ब्रिटनस्थित आबुबारा आणि जिहादी जॉन यांचे व्हिडीओ दाखवून भडकावल्याचे सांगितले होते. या सात जणांमधील एक जण केमिकल इंजिनिअर तर पत्नी-मुलांसह या संघटनेत दाखल होण्याच्या तयारीत होता. त्यांना इसिसमध्ये जाण्यासाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आलेले नव्हते, ते स्वखर्चाने या संघटनेत सहभागी होऊ इच्छित होते. पैशांसाठी कोण गुन्हेगार झाला किंवा गुन्ह्यात सहभागी होत असेल तर हे समजू शकते पण कोणतेही आर्थिक कारण नसताना उच्च शिक्षित तरुण जर अशाप्रकारच्या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याची इच्छा उराशी बाळगत असतील तर हा निश्चितच राष्ट्रासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. एकीकडे पोलिसांना खबर लागल्यावर संबंधितांचे मतपरिवर्तन केल्याचा दावा होत असेल तर दुसरीकडे अजून असे कितीतरी जण असतील की जे राष्ट्रद्रोह करण्याच्या मन:स्थितीपर्यंत पोहचले असतील. एखाद्या कारणाने अथवा संशयाने काही जण हाताशी लागतात पण जे हातात लागत नाही त्यांचे काय? दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचा विचार त्यांच्या मनात येतोच कसा आणि यामागे नेमकी कोणाची फूस आहे, हेदेखील शोधाचे मुद्दे आहेत.

Web Title: Who is the pallet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.