कोण आधी थकतं

By admin | Published: October 21, 2015 04:07 AM2015-10-21T04:07:14+5:302015-10-21T04:07:14+5:30

संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही

Who is thirsty | कोण आधी थकतं

कोण आधी थकतं

Next

संपूर्ण देशाचं काही सांगता येत नाही. परंतु किमान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि शिवसेना यांच्यात निदान या क्षणापर्यंत तरी सत्तेसाठीची भागीदारी टिकून असल्याने व बऱ्याचदा भागीदारीतही दोन भागीदारांमध्ये वरचढ ठरण्याचा एक सुप्त संघर्ष असतो, तसाच परंतु उघड उघड संघर्ष या दोहोत दिसून येतो आहे. फरक इतकाच की या संघर्षातून त्यांना ज्या एका प्रश्नाच्या उत्तराचा शोध आहे तो प्रश्न म्हणजे आधी कोण थकतं, तू का मी? किंवा मग असं तर नाही की, आपण दोघे सरकारात असल्याने व त्याचे ओझे बाळगण्याची आमची व कोणतेच ओझे न बाळगण्याची तुमची वृत्ती असल्याने तुम्ही धुडगूस घालीत राहा, आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी अशी सिद्धसाधकाची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे? कायमस्वरुपी भगव्या रंगाच्या प्रेमात रंगून जाणाऱ्या शिवसेनेला अलीकडे काळ्या रंगाविषयी बरेच ममत्व वाटू लागले आहे. असे असताना सोमवारी जे सैनिक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयावर चालून गेले तेव्हां त्यांना काही काळी शाई मिळाली नसावी. परिणामी त्यांनी नुसताच धुडगूस घातला. पाकी क्रिकेटचे अध्यक्ष शहरीयार खान तिथे येणार हे शिवसेनेना आधीच कळले होते. पण तिची मोठी बहीण असलेल्या व सरकारात बसलेल्या भाजपाला मात्र म्हणे तसे काही कळले नाही. बीसीसीआयने तसे सरकारला न कळवता केवळ सेनेला कळविले हे काही बरोबर झाले नाही! शशांक मनोहर यांनी आपले नागपूरपण जपण्यासाठी तरी फडणवीसांच्या ते कानावर घालण्यास हरकत नव्हती. पण मग सुधीन्द्र कुळकर्णी यांनीदेखील तीच चूक केली होती की काय? त्यांनी आगाऊ कळवायला हवे होते व फडणवीस सरकारने त्यांना संरक्षण द्यायला हवे होते. कळवूनही सरकार गाफील राहिले असेल तर मग ‘दया, कुछ तो गडबड है’! म्हणे आंदोलन करणे हा सेनेचा हक्कच आहे. ते बरोबर आहे. अखेर सेना रस्त्यावरची संघटना. ती सरकारात बसून सरकारच्या विरोधात आंदोलन करु शकते. सध्या तेच चालू आहे म्हणूनच उभयतात कोण आधी थकते याचीच वाट पाहाणे सुरु असावे असे दिसते!

Web Title: Who is thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.