ज्याची-त्याची पद्मावती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:22 AM2017-11-28T00:22:05+5:302017-11-28T00:23:14+5:30
परवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो.
- नंदकिशोर पाटील
परवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो. नाच तसा बरा होता म्हणा! पण ते जाऊं दे. आता म्हणे तो राणी पद्मावतीला अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नात आणून नाचवतोय! छेंछेंछें!! उद्या तो झांशीच्या राणीला इंग्रजांच्या, चाँदबीबीला पेशव्यांच्या नि सीतेला रावणाच्या स्वप्नात आणून नाचवेल. त्याचें काय?’ पुणेकरांचा युक्तिवाद बिनतोड होता म्हणून मग आम्ही कोल्हापूरकरांकडे मोर्चा वळवला. तर ते म्हणाले, ‘रांडच्या भन्साळीला म्हणावं, नाचिव की कोणास भी! काय फरक पडतुया? पद्मावती असूंदे की, ती कोण एलिजाबेथ असूंदे. आम्हास्नी कुणीबी चालतंय! एक ध्यानात ठेव म्हणावं. आमचं राजं ते राजंच. त्येंच्या वाटंला बिगर गेलासा तर इथंच खांडुळी’!! कोल्हापूरकरांचा एकूण आवेश बघून आम्ही जरा मागे सरलो. तर तेच पुढं येऊन कानात पुटपटले. ‘पाव्हणं कधी इतिया पद्मावती? तसं नव्हं. जरा तयारीत राहिला बरं..कायबी झालं तरी पहिला शो कदी चुकवत नाय आपण!’
शेतकरी आत्महत्यांनी आधीच परेशान असलेल्या विदर्भावर यंदा बोंडअळीच्या संकटाची भर पडली. त्यामुळे त्यांना पद्मावतीच्या या वादात नको ओढायला म्हणून आम्ही पुढे निघालो. तर तेवढ्यात मागून आवाज आला. ‘का म्हणून तुमी टाळून राहिले? कपासी करपली म्हणून तराटी जाते का भाऊं! संत्रा पिकवते म्हणून आंबटशौकीन समजून राहिले का? पद्मावती तर बीटी हाय म्हणं. जेनेटिकली मॉडिफाय! आता आमची ती वाट लावून राहिली कां बाप्पा!!’
कोकणी माणूस आणि वाद, हे तर फणस-ग-याचं नातं. म्हणून मग शेवटी आम्ही इरसाल मालवणकर तात्यांना गाठलं. ‘तात्यानु बरा असा ना? पद्मावतीच्यो काय करतास?’ तात्यांनी चष्मा चढवला अन् रंगलेल्या विड्याची पिचकारी मारली.
‘कोणाच्यो म्हशी नि कोणाक उठा बशी?
Nandu.patil@lokmat.com