हवेत कशाला वारकऱ्यांमध्ये धारकरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:52 AM2018-07-12T00:52:57+5:302018-07-12T00:53:46+5:30

परवा पुण्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्या दाखल झाल्या. त्या आधीपासूनच म्हणजे सकाळपासूनच वारक-यांचे जत्थे जत्थेच्या, तुळशीमाळा गळा घालून, पताका आणि नामघोषासह पुण्यात दाखल होत होेते. त्या सा-या वारक-यांचे स्वागत पुणेकर भक्तिभावाने करीत होते.

 Why in the Dharkari in the Warakari? | हवेत कशाला वारकऱ्यांमध्ये धारकरी?

हवेत कशाला वारकऱ्यांमध्ये धारकरी?

googlenewsNext

- रूपा कुळकर्णी बोधी

परवा पुण्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्या दाखल झाल्या. त्या आधीपासूनच म्हणजे सकाळपासूनच वारक-यांचे जत्थे जत्थेच्या, तुळशीमाळा गळा घालून, पताका आणि नामघोषासह पुण्यात दाखल होत होेते. त्या सा-या वारक-यांचे स्वागत पुणेकर भक्तिभावाने करीत होते. सा-याच वारक-यांच्या चेह-यांवर पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध लागल्याचे भाव दिसत असणार. त्यामुळे सारे वातावरण आपोआप भक्तिभावाने भारलेले आणि सात्विक बनून गेले असणार.
कितीतरी मैल चालून आलेले असतात हे वारकरी. पुढेही पंढरपूरपर्यंत कितीतरी अंतर चालावयाचे असते. शनिवारी पुण्यात आल्यावर शांतपणे दोन दिवस मुक्काम करून पुढचा प्रवास हे वारकरी करतात. वारकºयांची ही नित्याची वहिवाट आहे. त्यांना विठूच्या भक्तीपुढे कशाचीही चिंता वाटत नाही, की ते स्वत:च्या सुरक्षेसाठी कुणावरही अवलंबून नसतात. टाळ-मृदंगाच्या तालात पुढे पुढे जाणाºया लक्षावधी वारकºयांच्या या पंढरपूर वारीकडे सारं जग आश्चर्याने पाहात आले आहे. इतकी शिस्त वारकरी पाळतात.
त्यात मध्येच कुदून पडणारे हे धारकरी आहेत तरी कोण? आणि त्यांचा स्वयंघोषित नेता संभाजी भिडे हा तरी कोण आहे? भिडे गुरुजी नुसता मोकाट सुटला असून त्याचे उपद्रव समाजाला सतत त्रासदायक होत आहेत. मात्र महाराष्टÑ शासन त्याच्या या उपद्रवांना भिऊन सारी पोलीस यंत्रणा त्याच्या दिमतीला देते म्हणजे काय? या पालख्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या आगमनाच्या वेळी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी खरे तर पोलिसांची कुमक येत असते. परंतु परवा पुण्यात पोलीस पूर्णपणे संभाजी भिडेच्या दिमतीत होते. कारण त्याच्याबरोबर भगवे फेटे घातलेले शेकडो लोक होते आणि त्यांच्या हातात धारदार नंग्या तलवारी होत्या. म्हणून ते धारकरी. दिंडीतील वारकºयांचा, संभाजी भिडे व त्याच्या इशाºयावर त्या नंग्या तलवारी उपसून नाचणाºया तथाकथित दंगलखोर लोकांच्या येण्यास विरोध होता व गेल्या वर्षी भिडे अशा तलवार धाºयांसह सहभागी झाल्याने वाद निर्माण झाले होते. म्हणून यावर्षी त्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. पण त्याला काडीचीही किंमत न देता पुण्याच्या जंगली महारात मंदिरात भिडे व त्यांचे तलवारधारी सहकारी ठाण मांडून बसले व तिथूून ते सारे वारीत घुसणार होते. पण त्यांना अडविण्यात सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि पालख्या व्यवस्थितपणे मार्गस्थ झाल्यावरच त्यांना सोडण्यात आले.
भिडे गुरुजींचा संबंध दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांच्या घटनांशी आहे असे म्हटले जाते. भिडे व एकबोटे ही दोन नावे या हत्यांच्या संदर्भात घेण्यात येतात. परंतु साधे चौकशीसाठीही या माणसाला शासनाचे गुप्तहेर खाते पकडत नाही. आंबे खाऊन स्त्रियांना मुले होतात असा अजब शोध राजरोसपणे या माणसाने सोशल मीडियावरून सर्वत्र पसरविला. (त्याची भरपूर टवाळीही लोकांनी केली - मोठमोठ्या नेत्यांनीही केली.) त्यानंतर हे महाराज पुन्हा एकदा मनुस्मृतीबद्दल गुणगान करणारे काहीतरी आक्षेपार्ह बोलले. हा मनुष्य तरुणांची डोकी भडकवून त्यांना हिंसाप्रवृत्त करीत असणार यात काहीच संशय नाही.
यापुढे या मनुस्मृतिपूजक भिडे गुरुजीला मोकळीक देऊ नये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी हाती घेऊन भर रस्त्यावरून नाचवीत जाणे हाच केवढा मोठा गुन्हा आहे. एखाद्या नागरिकाने असे कृत्य केले तर शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यावरून त्याला पोलीस लगेच पकडून नेतात. मग भिडे गुरुजी जंगली महाराज मंदिरात राजरोसपणे तलवारबाज धारक-यांसोबत ठाण मांडतो, मग भररस्त्याने त्या परजत जातो आणि संत ज्ञानेश्वरांच्या-संत तुकारामांच्या पालख्यांसमोर उभा राहतो. बंदीचा हुकूम सरळसरळ पायदळी तुडवितो आणि पोलीस नुसते बघत राहतात. याला काय म्हणावे? हे उघड उघड अधर्माचे कृत्यच नाही काय? म्हणूनच यापुढे पंढरीच्या वारकºयांमध्ये जाण्यास धारकºयांना पूर्णपणे मज्जाव करावा.
 

Web Title:  Why in the Dharkari in the Warakari?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.