‘वाईच गप ऱ्हावा’
By admin | Published: June 4, 2016 02:08 AM2016-06-04T02:08:58+5:302016-06-04T02:08:58+5:30
आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेश’ मधील एका प्रसंगात डोळ्यासमोर हाताचा आडवा पंजा धरुन आकाशात पाहाणारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारा अल्प वा अशिक्षित खेडूत दिसतो.
आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेश’ मधील एका प्रसंगात डोळ्यासमोर हाताचा आडवा पंजा धरुन आकाशात पाहाणारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारा अल्प वा अशिक्षित खेडूत दिसतो. भारत सरकारने आता त्याचा शोध घेऊन त्यालाच देशभर फिरवून गावोगावचे पावसाचे अंदाज जाणून घ्यावेत हे बरे! सामान्यत: दरवर्षी मे किंवा फार फार तर एप्रिल महिन्यात वेधशाळा आगामी पावसाळ्याचा अंदाज व्यक्त करीत असतात. यंदा थेट जानेवारी महिन्यापासूनच असे अंदाज येऊ लागले. पहिला अंदाज होता पावसाळा नेहमीपेक्षा लवकर सुरु होण्याचा आणि सरासरीच्या १२०टक्क््यांहून अधिक पाऊस पडण्याचा. कालांतराने या टक्केवारीत घट होऊ लागली पण ती शंभरच्या खाली गेली नाही. काहींच्या मते अतितीव्र दुष्काळामुळे त्रस्त आणि हताश झालेल्या देशवासियांचे ‘मोराल’ उंचावले जावे म्हणून ते केले जात होते वा केले जात आहे. यंदा अल आणि एल या दोन्ही निनोंचा काही त्रास नाही तेव्हां पाऊस रग्गड असेही अधूनमधून सांगितले जाऊ लागले. त्यानंतर अंदमानात पाऊस सुरु झाला पण ‘रोनू’ नावाच्या चक्रीवादळाने त्याची वाट रोखून धरली. हळूच कोकण किनारपट्टीवर चोवीस तासात पाऊस सुरु होईल पण तो मान्सूनपर्व म्हणजे अवकळ्या असेल अशा अंदाजाच्या बातम्या झळकून गेल्या. मध्यंतरी वसंतराव गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करता यावा म्हणून दोनेक डझन मानकं तयार करण्यात आली आहेत आणि अंदाज कधीच चुकणार नाहीत असे दिलासेदेखील दिले गेले. पण गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता केवळ चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकातच पावसाळा सात जूनला सुरु होतो, प्रत्यक्षात मात्र जुलै उजाडून जातो. यंदाच्या वर्षी पावसाच्या अंदाजांचा जरा अतिरेकच झाला आणि अजूनही होतोच आहे हे खरे असले तरी हे दरवर्षीचेच आहे. पाऊस सुरु झाला की मग तो कशामुळे याबाबत मात्र पोपटपंची सुरु होते. त्यामुळे तो आता जेव्हां यायचा तेव्हा येईल तोवर वेधशाळांनो, ‘वाईच गप ऱ्हावा’! हेच सांगणं