जाणिवांना आकार देणारे स्क्रीनचे जग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:03 AM2019-07-27T02:03:40+5:302019-07-27T02:04:06+5:30

स्क्रीनमुळे मशीन्समध्ये जिवंतपणा येतो. ती बोलू लागतात, त्यामुळे आपण सहजच यंत्रांशी जोडले जातो. आपण त्या यंत्रात काही इनपुट दिले की ते आपल्याला स्क्रीनवर पाहता येतात.

The world of screens shaping emotions | जाणिवांना आकार देणारे स्क्रीनचे जग

जाणिवांना आकार देणारे स्क्रीनचे जग

Next

संतोष देसाई

ही वर्षांपूर्वी मोबाइलवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात एक लहान मूल हातातील मासिकाचे पान बोटाने दाबत होते असे दाखवले होते. आपल्या बोटाच्या स्पर्शाने त्या पानात काही तरी बदल घडून येईल असे त्याला वाटत होते, पण न्यूजप्रिंट हा काही टचस्क्रीन नाही हे त्याला कसे समजणार? पण आपल्या जीवनात या पडद्यांचे ‘टचस्क्रीन’चे आक्रमण फार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते.

चीनच्या दौऱ्यावर असताना या गोष्टीचा अनुभव मला विलक्षण पद्धतीने आला. तेथे तर एखाद्या रोगाची लागण व्हावी तसे अत्र-तत्र-सर्वत्र पडदेच (स्क्रीन) पाहायला मिळाले. भारतसुद्धा त्याला अपवाद राहिला नाही. जगभर सर्वत्र हे स्क्रीन्स पाहावयास मिळतात, पण चीनमध्ये त्याचे प्रमाण अधिक पाहायला मिळाले. इमारतीवर, विमानतळावर, दुकानासमोर, दुकानाच्या आत, चौका-चौकात बसवर हे स्क्रीन पाहावयास मिळतात. हे स्क्रीन लहान नव्हते तर चांगले मोठमोठे होते. त्यावरून चित्रे आणि अक्षरे भराभर सरकत होती. सध्याचे जग गतिमान झाले आहे, त्याचे जणू चित्र त्या स्क्रीन्सवर दिसत होते.

सध्या आपण या स्क्रीन्सच्या जगातच वावरत आहोत. आपल्या टीव्हीचे किंवा कॉम्प्युटरचे स्क्रीन वगळता खेळण्याची साधने, बिलबोर्ड, एटीएम, काही प्रकारचे रेफ्रिजरेटर्स, स्वत: वापरता येण्याजोगी टपरीवजा दुकाने, अशी या स्क्रीन्सची यादी लांबलचक आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी स्क्रीनची आवश्यकता वाटू लागली आहे. पूर्वी फोनचे डायलिंग हे एकप्रकारचे स्क्रीनच होते. पण त्याची जागा आता टचबटन्सने घेतली. घड्याळे, रिस्ट वॉचेस, वजनमापकांसारखी यंत्रे यांच्यातही स्क्रीन असतात. टीव्ही स्क्रीन, रेडिओचे स्क्रीन यांचे उद्दिष्ट मर्यादित आहे. त्यानंतर स्क्रीन्स असलेल्या कॉम्प्युटरचे आगमन झाले. आधुनिक म्हटल्या जाणाºया गोष्टीसुद्धा आता अत्याधुनिक झाल्या आहेत! मोबाइल्सच्या आगमनानंतर टचस्क्रीन्स हे सर्वव्यापी झाले आहेत.

स्क्रीनमुळे मशीन्समध्ये जिवंतपणा येतो. ती बोलू लागतात, त्यामुळे आपण सहजच यंत्रांशी जोडले जातो. आपण त्या यंत्रात काही इनपुट दिले की ते आपल्याला स्क्रीनवर पाहता येतात. त्या माहितीचे यंत्राकडून काय केले जाते हेही आपल्याला पाहावयास मिळते. अशा तºहेने तंत्रज्ञान बोलू लागले आहे. कॉम्प्युटरवर दिलेल्या कमांडमुळे कर्सर उघडझाप करू लागतो आणि आपल्या कमांडचे चित्र स्क्रीनवर उमटते. आपल्या डिजिटल लँडस्केपचा स्क्रीन्स हा चेहरा बनले आहेत. आपले अनुभव या स्क्रीनवर संग्रहित होऊ लागले आहेत. टचस्क्रीनमुळे आपले हेतू अधिक स्पष्ट झाले आहेत. माऊसच्या माध्यमातून आपल्या इच्छांची प्रत्यक्ष अनुभूती इतरांना होऊ लागली आहे. टचस्क्रीनमुळे स्क्रीनमध्ये चैतन्य येते आणि आपल्या इच्छांची लगेच पूर्तता होते!

स्क्रीन्समध्ये प्रोग्रामिंगची क्षमता असते, त्यामुळे आपल्या इच्छांची लगेच पूर्तता होते. त्यामुळे मोबाइल फोनला जगद्व्यापी यंत्राचे विराट स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याच्या लहानशा शरीरात अनेक तºहेच्या क्षमता कोंबून भरलेल्या पाहावयास मिळतात. स्क्रीन हा आपल्या जीवनाचा वॉलपेपरच झाला आहे. दृश्य स्वरूप नव्या प्रकारात पाहणे त्यामुळे शक्य झाले आहे. त्याने आपल्यासाठी पर्यायी वास्तवता निर्माण केल्या आहेत, जगाला जे काही देण्याची इच्छा आहे ते सर्व स्क्रीन आपल्यास देत असते, पण त्यात स्वत:ची कलात्मकता आणण्याची क्षमता मात्र त्याच्यात नसते. आपल्या आयुष्याचा स्क्रीन हा एक पदर आहे, तो आपले लक्ष वेधून घेत असतो आणि आपल्याला त्याच्यासाठी वेळ देण्यास भाग पाडत असतो. स्क्रीनवर जे काही पाहायला मिळते त्याच्याशी त्या स्क्रीनची कोणतीच बांधिलकी नसते, पण त्याच्याकडे येते ते सगळे काही तो सामावून घेत असतो. त्याच्या अस्तित्वात मात्र कायमचे क्षणभंगुरत्व असते! कधी कधी त्या स्क्रीनवर अंधार पसरतो, पण क्षणात त्याच्यावर नवीन काहीतरी प्रकटते. पूर्वी जाहिरात फलक आणि निआॅन साइन्स असायचे, आता त्यांची जागा सर्वव्यापी स्क्रीन्सने घेतली आहे. एक तर आपण स्क्रीन्समुळे घेरलेले किंवा त्यात आकंठ बुडालेले असतो.

हे स्क्रीन आपल्यात सांस्कृतिकदृष्ट्या अनेक बदल घडवून आणतात. केव्हीन केली या लेखकाने लोकांचे वर्गीकरण दोन प्रकारांत केले आहे. काही माणसं पुस्तकात बुडलेली असतात तर काही स्क्रीन्सच्या आहारी गेलेली असतात. पहिल्या प्रकारचे लोक कष्टकरी असतात. ते वृत्तपत्रे, नियतकालिके काढतात. तसेच कायदा, प्रशासन आणि अर्थव्यवस्थेचे नियम तयार करतात. ते पुस्तकावर जगतात. त्यामुळे त्यांना अधिकार मिळतात तर स्क्रीन्सच्या आहारी गेलेले लोक पिक्सेलमध्ये अडकून पडतात. तेथे सतत उलटपालट सुरू असते. बाइट्सचे आवाज घुमतात. त्यावरील कल्पना या अर्धवट, अपरिपक्व असतात. आपण आज ज्या जगात राहतो त्याचे वर्णनसुद्धा याच पद्धतीने करता येईल. उत्तेजक आणि धक्कादायक, चैतन्ययुक्त तसेच थकवा आणणारे प्रेरक तसेच थिजवून टाकणारे असे हे जग झाले आहे. त्यात परस्पर प्रक्रिया (इंटरअ‍ॅक्शन) किंवा सादरीकरण (डिस्प्ले) करणाºया तंत्रज्ञानापेक्षा स्क्रीन हे वेगळे असतात. कारण आपल्या विचारांना, जाणिवांना आणि अनुभवांना आकार देणाºया आपल्या आकलनशक्तीला ते साहाय्य करीत असतात.

(लेखक तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

Web Title: The world of screens shaping emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.