जीएसटी अंमलबजावणीनंतरचे रिटर्न भरताना काळजी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:55 AM2019-05-20T04:55:35+5:302019-05-20T04:55:39+5:30

अर्जुन ( काल्पनिक पात्र) : कृष्ण, आर्थिक वर्ष संपल्यानंतर, सर्वत्र वार्षिक रिटर्नच्या संदर्भात चर्चा सुरू आहे़ ते काय आहे? ...

Worried about filling the return after GST execution | जीएसटी अंमलबजावणीनंतरचे रिटर्न भरताना काळजी गरजेची

जीएसटी अंमलबजावणीनंतरचे रिटर्न भरताना काळजी गरजेची

Next

अर्जुन ( काल्पनिक पात्र) : कृष्ण, आर्थिक वर्ष संपल्यानंतर, सर्वत्र वार्षिक रिटर्नच्या संदर्भात चर्चा सुरू आहे़ ते काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीआर-९ हे वर्षातून एकदा दाखल करणे आवश्यक आहे़ यात करदात्याला खरेदी व विक्रीचा तपशील द्यावा लागेल.़ वार्षिक रिटर्न हे मासिक किंवा रिटर्नमध्ये दिलेली माहिती एकत्रित करून देणे़
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ दाखल करणे कोणाला आवश्यक आहे? व ते दाखल करणे आवश्यक आहे का?
कृष्ण : अर्जुना होय, नोंदणीकृत व्यक्तीने जीएसटीआर-९ दाखल करणे आवश्यक आहे.
अर्जुन : कृष्णा, त्यात काही अपवाद आहेत का?
कृष्ण : अर्जुन, प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीला जीएसटीआर-९ दाखल करणे आवश्यक आहे. तथापि, खालील व्यक्ती याला अपवाद आहेत़
* इनपुट सेवा वितरक,
* प्रासंगिक करपात्र व्यक्ती आणि
* अनिवासी करपात्र व्यक्ती.
* कलम ५१ (टीडीएस) किंवा कलम ५२ (टीसीएस) अंतर्गत कर भरणारे,
कलम ५२ (टीसीएस) अंतर्गत कर भरणाऱ्या व्यक्तीने जीएसटीआर-९ बी दाखल करणे आवश्यक आहे, परंतु सेक्शन ५२ ची तरतूद केवळ १ आॅक्टोबर, २०१८ पासून लागू आहे, तर २०१७-१८ वर्षासाठी त्यांना जीएसटीआर-९बी दाखल करण्याची आवश्यकता नाही.
हीदेखील लक्षात घेतली पाहिजे की, कम्पोजिशनमधील करदात्यांना जीएसटीआर-९अ दाखल करणे आवश्यक आहे
अर्जुन : कृष्ण, जीएसटीआर-९ फॉर्ममध्ये कोणत्या तपशिलांची आवश्यकता आहे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ हे ६ भाग आणि १९ टेबलमध्ये विभागले गेले आहे :
भाग १ : हा आर्थिक वर्ष, जीएसटी नंबर कायदेशीर आणि व्यवसायिक नावे यासारखी मूलभूत माहिती विचारतो व ही माहिती स्वयंपूर्ण होईल.
भाग २ : हा एक भाग आहे, जिथे करदात्याने वित्तीय वर्षादरम्यान जाहीर केलेल्या आवक आणि जावक पुरवठ्याची माहिती द्यावी लागेल़ वित्तीय वर्षामध्ये दाखल केलेल्या सर्व जीएसटी रिटर्न्स एकत्रित करून त्याची माहिती द्यावी लागेल़
भाग ३ : या भागात करदात्याला रिटर्न्समध्ये जाहीर केल्याप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिटची माहिती द्यावी लागेल़ इनपुट टॅक्सच्या तपशिलात न मिळणाºया टॅक्स क्रेडिटचे रिव्हर्स करावे लागेल़
भाग ४ : या भागात करदात्यांनी मागील आर्थिक वर्षात भरलेल्या करांचे तपशील द्यावे लागेल़
भाग ५ : या भागात मागील वर्षातील दुरुस्तीची माहिती द्यावी लागेल़
भाग ६ : या भागात, करदात्याला इतर माहिती द्यावी लागेल, म्हणजेच कम्पोजिशन करदात्याकडून केलेल्या खरेदीची माहिती़ एचएसएननुसार खरेदी व विक्री, डिमांड व रिफंड, लेट फिस इत्यादींची माहिती द्यावी लागेल़
अर्जुन : कृष्णा, ज्या करदात्यांनी ३१ मार्च, २0१८ च्या पूर्वी नोंदणी रद्द केली असेल, तर त्यांना जीएसटीआर-९ दाखल करावे लागेल का?
कृष्ण : अर्जुना, होय, ज्या करदात्यांनी ३१ मार्च, २0१८ च्या पूर्वी नोंदणी रद्द केली असेल, तर त्यांना जीएसटीआर-९ दाखल करावे लागेल.
अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ ज्या करदात्याची उलाढाल काहीच नाही, त्यांना वार्षिक रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे का?
कृष्ण: होय, ज्या करदात्याची वार्षिक उलाढाल काहीच नाही, त्यांनाही वार्षिक रिटर्न दाखल करणे गरजेचे केले आहे.
अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ दाखल करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३0 जून, २0१९ आहे.
अर्जुन: कृष्णा, जर करदात्यांनी जीएसटीआर-९ दाखल केले नाही, तर काय होईल?
कृष्ण: अर्जुन, करदात्यांनी देय तारखेच्या आत जीएसटीआर-९ न दाखल केल्यास लेट फी देण्याची तरतूद आहे. ती खालीलपैकी जी जास्त रक्कम होईल ती:
अ) राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या करदात्याच्या उलाढालीच्या २.५ टक्के.
ब) प्रत्येक दिवसाला सीजीएसटी आणि एसजीएसटीसाठी प्रत्येकी १00 रुपये.
अर्जुन: कृष्णा, यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण: अर्जुना, जीएसटीच्या अंमलबजावणीपासून हे प्रथम वार्षिक रिटर्न असेल. हे प्रथम वार्षिक रिटर्न असल्यामुळे करदात्याला काळजी घ्यावी लागेल. या वार्षिक रिटर्नमध्ये संपूर्ण वर्षामधील गेलेल्या रिटर्न्समधील माहिती एकत्रित करून द्यावी लागेल व यामध्ये इनपुट टॅक्सच्या क्रेडिटची रक्कम बदलता येणार नाही, परंतु अतिरिक्त रक्कम भरावयास निघत असेल, तर ती भरावी लागेल.

करनिती भाग २८६
उमेश शर्मा । सीए

Web Title: Worried about filling the return after GST execution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.