योगाची व्याख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2017 11:34 PM2017-03-13T23:34:03+5:302017-03-13T23:34:03+5:30

सध्याच्या जीवनात योग फारच लोकप्रिय झाले आहे. देश-विदेशात योगाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणी आसनाला, कोणी प्राणायामला, तर कोणी ध्यानाला योग समजतात.

Yoga Definition | योगाची व्याख्या

योगाची व्याख्या

googlenewsNext

डॉ. भूषणकुमार उपाध्याय
सध्याच्या जीवनात योग फारच लोकप्रिय झाले आहे. देश-विदेशात योगाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणी आसनाला, कोणी प्राणायामला, तर कोणी ध्यानाला योग समजतात. जेव्हा आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतो, तेव्हा आम्हाला समजते की योग ही एक अशी मोठी वैज्ञानिक साधना आहे की, ती शरीर, मन आणि चेतना ह्या तिघांना शुद्ध करून परम चेतनेशी जोडते.
योग शब्द संस्कृतमधील युज् धातूपासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जोडणे असा आहे. सर्वात प्रथम आम्ही आपल्या शरीराला आपल्या मनाशी जोडतो. त्यानंतर व्यक्तीला व्यक्तीशी जोडतो. त्यानंतर मनुष्याला निसर्गाशी जोडतो आणि सर्वात शेवटी आम्ही मनुष्याला त्याच्या मूळ रूपाशी जोडून त्याला परमानंदाशी जोडतो. ही योगाची संकल्पना पूर्णत: भारतीय संस्कृतीची देन आहे. भारतीय विचारवंतांनी योगाची एक विशाल आणि वैज्ञानिक रचना तयार केलेली आहे. महर्षी पतंजली यांनी आपल्या योगशास्त्रात सर्वात प्रथम याची फारच विस्तृत आणि तर्कसंगत व्याख्या केलेली आहे. परंतु महर्षी पतंजली यांच्या अगोदरसुद्धा अनेक भारतीय ग्रंथात योग शब्दाचा वापर झालेला आहे. श्रीमद्भगवतगीतेत ‘समत्वं योग उच्चते’ आणि ‘योग: कर्मसु कौशलम्’ अशा दोन प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. पहिल्या व्याख्येनुसार जेव्हा आमच्या विचारात संतुलन येते, तेव्हा आम्हाला योग प्राप्त होतो. योगी सुख-दु:ख, मान- अपमान, नफा-तोटा इत्यादिमध्ये ना तो उत्साहित होतो, ना विचलित होतो. तो सर्व घटनांकडे साक्षीभावाने पाहतो. दुसऱ्या व्याख्येनुसार माणूस जेव्हा आसक्तीरहित कर्म करण्यात पारंगत होतो, तेव्हा त्याला योग प्राप्त होतो. आसक्तीरहित कर्म केल्यामुळे मनुष्यसुद्धा विचलित होत नसून त्याला समानता प्राप्त होते. महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णत: निरुद्ध होते, तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्कामभावाने कर्म करण्यास प्रारंभ करतो. महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाचे आठ अंग सांगितलेले आहेत. यम सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे. नियम शौच, संतोष तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे अनुष्ठान आहे. प्राणायाम मनाच्या शांतीचे साधन आहे. प्रत्याहार मनाला भोगांपासून परावृत्त करतो. धारणा एकाग्रताचे नाव आहे. एकाग्रताचे स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परम चेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी. योग ही भारतीय संस्कृतीचे विश्व संस्कृतीला दिलेली एक अमोल देणगी आहे.

Web Title: Yoga Definition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.