‘झेडपी’च्या डिजिटल शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:51 AM2017-10-07T02:51:57+5:302017-10-07T02:52:20+5:30
खेड्यापाड्यांतल्या ‘झेडपी’च्या शाळांना नवा जन्म देणाºया महाराष्ट्रातल्या एका अबोल क्रांतीची विलक्षण कहाणी
- भाऊसाहेब चासकर
महाराष्ट्राच्या वस्ती-पाड्यावरच्या अनेक पडक्या, दुर्लक्षित सरकारी शाळा जिवंत होऊ लागल्या आहेत,
इथली ग्रामीण-आदिवासी मुलं कॉम्प्युटर वापरतात, यू ट्यूबवर जग बघायच्या ओढीनं शाळेत येतात...
आणि ही जादू घडवली आहे काही धडपड्या तरुण शिक्षकांनी!
खेड्यापाड्यांतल्या ‘झेडपी’च्या शाळांना नवा जन्म देणाºया महाराष्ट्रातल्या एका अबोल क्रांतीची विलक्षण कहाणी
‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी! नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!! त्यातून गावखेड्यातली मुले निसर्गाच्या साथीत रमणारी. त्यांना बंद वर्गखोलीत बसून शिक्षकांची भाषणे ऐकणे नकोसे होते. मन रमत नाही. मग शाळेत यावेसे वाटत नाही. शेत खुणावते. डोंगर खुणावतात. झाडे बोलावतात. न कळणारे इंग्रजी घोकण्यापेक्षा
मोकळ्या रानात गुरे वळायला जाणे जास्त मजेचेच असते. ...पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेडोपाडीची, वाडीवस्त्यांवरची मुले
शहरी कॉन्व्हेंटवाल्यांना टक्कर देत डिजिटल जगाच्या सफरीवर निघाली आहेत. या शाळांच्या भिंती चित्रांनी सजल्या आहेत. आधीच्या ओसाड अंगणात झाडांची, पक्ष्यांची गजबज आहे. शाळेत कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर, टॅब्लेट, लॅपटॉप आणि वेब कॅमेरे आले आहेत.
अनेक शाळांनी स्वत:च्या व्हर्च्युअल लॅब, डिजिटल स्टुडिओ उभारले आहेत. आॅगमेण्टेड रिअॅलिटी बुक्स वापरून खुर्द- बुद्रुकमधल्या वर्गांत पाठ्यपुस्तके जिवंत होऊ लागली आहेत. स्मार्टफोन, व्हॉट्सअॅप, स्काइप अशी साधी साधने वापरून ही मुले जगाशी जोडली जात आहेत.
... ही जादू कुणी केली?
धडपड्या तंत्रस्नेही तरुण शिक्षकांनी! पदरमोड करून, मदत मागून, गावातून लोकसहभाग मिळवून
या शिक्षकांनी आपापल्या शाळांचा ‘सरकारी’ नक्षाच बदलून टाकला आहे.
२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये
प्रसिद्धी : दिवाळीच्या पणत्या अंगणात लागण्याच्या कितीतरी आधी!
तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com
आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com
नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा : 8425814112