अकरावीच्या एक लाख जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत; दुसरी विशेष फेरी १५ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 08:25 AM2022-09-11T08:25:19+5:302022-09-11T08:26:20+5:30

या विशेष फेरीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही १ लाख ०७ हजार ७२६ जागा रिक्त आहेत.

11 lakh seats awaiting admission; Second special round on 15th September | अकरावीच्या एक लाख जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत; दुसरी विशेष फेरी १५ सप्टेंबरला

अकरावीच्या एक लाख जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत; दुसरी विशेष फेरी १५ सप्टेंबरला

googlenewsNext

मुंबई : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता दुसरी विशेष फेरी आजपासून राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे, आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल. या विशेष फेरीत आता पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहे. 

या विशेष फेरीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही १ लाख ०७ हजार ७२६ जागा रिक्त आहेत.  अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने, तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. दरम्यान, पहिल्या विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट प्राप्त ७९ हजार ५१३ विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. 

एटीकेटी विद्यार्थ्यांनी असा भरावा अर्ज
एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेतील सहा विषयांचे गुण भरावेत. 
गुणपत्रिका एकापेक्षा जास्त असल्यास सर्वांत शेवटच्या परीक्षेचा बैठक क्रमांक अर्जात नोंदवून गुणपत्रके अपलोड करावीत.
एटीकेटी असल्यास उर्वरित एक किंवा दोन विषयांचे सर्वोत्तम गुण मोजून सहाशेपैकी गुण नोंदवावेत. 
ते गुण पाचेशपैकी रूपांतरित करून गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील.
एटीकेटी विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज भरून भाग एक आणि भाग दोन पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे.
भाग एक यापूर्वी भरला असल्यास त्यातील माहिती आवश्यकतेनुसार सुधारित करून अर्ज लॉक करावा. 
जुलै २०२२ च्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी रिपीटर म्हणून अर्ज भरावा.

Web Title: 11 lakh seats awaiting admission; Second special round on 15th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.