12th Exam: बारावी परीक्षेला पर्याय काय? राज्य सरकार विचारात, विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:06 AM2021-05-27T09:06:49+5:302021-05-27T09:07:25+5:30

12th Exam Update: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

12th Exam: What are the options for 12th exam? Confusion among students, parents in state government consideration | 12th Exam: बारावी परीक्षेला पर्याय काय? राज्य सरकार विचारात, विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम

12th Exam: बारावी परीक्षेला पर्याय काय? राज्य सरकार विचारात, विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करणे शक्य नसल्यामुळे त्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र, परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिक्षणतज्ज्ञांकडून परीक्षेबाबत वेगवेगळे पर्याय सुचविले जात आहेत, तर विद्यार्थ्यांनीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने आणि कमी गुणांची परीक्षा घेऊन आम्हाला तणावातून दूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

ऑफलाईन पर्याय स्वीकारला तर प्रश्नांची संख्या कमी करून परीक्षेची वेळ कमी करावी. परीक्षा टाळायचीच असेल तर विद्यार्थ्यांनी कृतिसंशोधन प्रकल्प सादर करावा व शिक्षकांनी त्यावर त्यांची ऑनलाईन तोंडी परीक्षा घ्यावी. दहावी व अकरावीच्या गुणांवर इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा.
- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

कमी गुणांची सर्व विषयांवरील प्रश्नांची एकच परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. नीट, जेईई यासारख्या परीक्षा इयत्ता बारावीनंतर घेतल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाकडे लक्ष देऊन त्याच्याशी सुसंगत निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.
- डॉ. वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

इयत्ता बारावीची परीक्षा घेणे आवश्यक आहे. ती कोणत्या पद्धतीने घ्यावी याचा विचार राज्य मंडळाने करावा. सर्व बाबींचा विचार करून बारावीची परीक्षा घेता येईल.
- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर शासनाने शिष्यवृत्तीसारखी एकच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा. 
- ओम ‌नवले, विद्यार्थी, 
इयत्ता बारावी, स. प. महाविद्यालय

ऑनलाईन परीक्षा घेतल्या तर सर्वच विषयांची परीक्षा देणे शक्य होईल. मात्र, ऑफलाईन काही निवडक विषयांची परीक्षा घ्यावी.
- ईश्वरी पाटील, विद्यार्थी, मुक्तांगण

Web Title: 12th Exam: What are the options for 12th exam? Confusion among students, parents in state government consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.