बारावीसाठी ९,६१३, तर दहावीची २१,३४९ केंद्रे; शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्राची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:27 AM2022-02-16T05:27:32+5:302022-02-16T05:27:54+5:30

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरुवातीस ऑनलाइन पद्धतीने व ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले.

9,613 centers for class XII and 21,349 centers for class X; The school has examination center and sub-center facilities there | बारावीसाठी ९,६१३, तर दहावीची २१,३४९ केंद्रे; शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्राची सुविधा

बारावीसाठी ९,६१३, तर दहावीची २१,३४९ केंद्रे; शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्राची सुविधा

Next

मुंबई : यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र या पद्धतीने नियोजन केले असून, इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या ९,६१३, तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची /उपकेंद्रांची संख्या २१,३४९ इतकी असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरुवातीस ऑनलाइन पद्धतीने व ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले. आता प्रचलित पद्धतीने राज्य मंडळाच्या परीक्षा होत असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवातही झाली आहे. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

Web Title: 9,613 centers for class XII and 21,349 centers for class X; The school has examination center and sub-center facilities there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा