एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:50 AM2024-08-20T10:50:52+5:302024-08-20T10:51:07+5:30
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बहुप्रतिक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील.
सीईटी सेलने एमबीबीएस या अभ्यासक्रमासह बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात केली आहे. मात्र, प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले नाही. येत्या काही दिवसांत ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. त्यानंतरच विद्यार्थी कॅप फेरीसाठी अर्ज करू शकतील. विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी नोंदणी करताना स्कॅन करून कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तसेच अर्ज पडताळणी करताना मूळ कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत.