२६ सप्टेंबरपर्यंत वैद्यकीय, दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरू
By सीमा महांगडे | Published: September 23, 2022 11:23 AM2022-09-23T11:23:30+5:302022-09-23T11:23:54+5:30
ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये पीडब्लूडी (दिव्यांग) उमेदवार म्हणून अर्ज केला आहे. अशानी नोंदणीच्यावेळी अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर (नीट पीजी) व दंत पदव्युत्तर (नीट एमडीएस) अभ्यासक्रमाच्या राज्यस्तरीय कोटा प्रवेशासाठी उमेदवारांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ही नोंदणी प्रक्रिया २६ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका व सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या सेवा-कार्यातील उमेदवारांनीही नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे. हे उमेदवार इन-सर्व्हिस कोट्याच्या जागेसाठी पात्र असतील. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये पीडब्लूडी (दिव्यांग) उमेदवार म्हणून अर्ज केला आहे. अशानी नोंदणीच्यावेळी अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज वेळेत भरणे आवश्यक आहे. मुदतीच्या अखेरपर्यंत अर्ज भरण्याची वाट पाहू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी – २६ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क भरणे – २६ सप्टेंबरपर्यंत
सर्वसाधारण गुणवत्ता यादी – २७ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजता
प्रोव्हिजनल राज्य गुणवत्ता यादी – २८ सप्टेंबर, सायंकाळी ५ वाजता
प्राधान्यक्रम देणे, ऑप्शनफॉर्म भरणे – २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर
पहिली निवड यादी – ३ ऑक्टोबर, रात्री ८ नंतर
मूळ कागदपत्रे आणि शुल्क भरणे – ४ ते ८ ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० पर्यंत