Bhagat Singh Koshyari, Education: राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समित्या गठीत

By यदू जोशी | Published: September 29, 2022 07:03 PM2022-09-29T19:03:13+5:302022-09-29T19:06:54+5:30

प्रा. प्रमोद कुमार जैन, आनंद लिमये या निवड समितीचे सदस्य

Bhagat Singh Koshyari, Education: Governor forms Vice-Chancellor Selection Committee for Mumbai, Pune and Sanskrit University | Bhagat Singh Koshyari, Education: राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समित्या गठीत

Bhagat Singh Koshyari, Education: राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समित्या गठीत

Next

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ अभय करंदीकर व शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हे या समितीचे सदस्य असतील. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोजने माजी अध्यक्ष प्रा. डॉ प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. वेरावळ गुजरात येथील श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Bhagat Singh Koshyari, Education: Governor forms Vice-Chancellor Selection Committee for Mumbai, Pune and Sanskrit University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.