मोठी बातमी: वर्षातून दोन वेळा होणार CBSE बोर्डाची परीक्षा, असा ठरणार अभ्यासक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:09 PM2021-07-05T21:09:13+5:302021-07-05T21:10:58+5:30
CBSE Exam News: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळने २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)ने २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष असेसमेंट स्कीमनुसार या सत्रामध्ये दोन वेळा परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. बोर्डाने या संबंधिचा अभ्यासक्रम या महिन्याच्या अखेरीपर्यंत जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. (CBSE Academic session 2021-22 of class 10th & 12th to be divided into 2 terms with approx 50% syllabus in each term)
Academic session 2021-22 of class 10th & 12th to be divided into 2 terms with approx 50% syllabus in each term. Syllabus for Board examination 2021-22 will be rationalized similar to that of last academic session to be notified in July 2021: Central Board of Secondary Education pic.twitter.com/8vyfPUhWX7
— ANI (@ANI) July 5, 2021
सीबीएसईने सांगितले की, अॅकॅडमिक सेशन २०२१-२२ दोन टर्ममध्ये विभाजित होईल. प्रत्येक टर्ममध्ये सुमारे ५०-५० टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल. माहितीनुसार सीबीएसई पहिल्या सत्राची परीक्षा ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित करेल. त्यानंतर दुसऱ्या सत्राची परीक्षा ही मार्च एप्रिलमध्ये घेण्यात येईल. शैक्षणिक सत्र २०२२१-२२ च्या अभ्यासक्रमाचे विषय तज्ज्ञांकडून आकलनक्षमता आणि विषयांचे परस्पर संबंध पाहून एका व्यवस्थित दृष्टीकोनाचे पालन करत दोन भागांमध्ये विभाजित करण्यात येईल.