कोरोनानंतर आता महाराष्ट्रात BTech नोंदणीत झाली 24.5 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 02:32 PM2022-07-27T14:32:31+5:302022-07-27T17:02:42+5:30

B.Tech किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा एक अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री प्रोग्राम आहे ज्याने गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली ...

BTech registration rise to 24.5% in Maharashtra post-Covid-19 | कोरोनानंतर आता महाराष्ट्रात BTech नोंदणीत झाली 24.5 टक्क्यांची वाढ

कोरोनानंतर आता महाराष्ट्रात BTech नोंदणीत झाली 24.5 टक्क्यांची वाढ

Next

B.Tech किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा एक अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्री प्रोग्राम आहे ज्याने गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अभियांत्रिकी क्षेत्र (Engineering Sector) हे भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. हे औद्योगिक क्षेत्रातील एकूण कारखान्यांपैकी 27% आणि एकूण विदेशी सहयोगांपैकी 63% प्रतिनिधित्व करते.

महाराष्ट्रातील टॉप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आयआयटी बॉम्बे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, व्हीएनआयटी नागपूर इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रात 475 बीटेक महाविद्यालये बीटेक कोर्सेस देतात, त्यापैकी 427 खासगी आणि 43 सरकारी आहेत.

कोरोनाचा परिणाम

कुटुंबांसमोर आर्थिक संकट, लॉकडाऊन, नोकरी गमावणं, पगारात कपात करणं आणि प्रवेश सुरू होण्यास होणारा विलंब यामागे कोरोना हे कारण होतं. त्यामुळेच बीटेक अभ्यासक्रमांच्या नोंदणीत घट झाली आहे. ज्या कुटुंबांनी काही विद्यार्थ्यांना बीटेक कोर्सेस सोडून देण्यास भाग पाडले त्यांच्यासाठी मागील 2 वर्षे ही आर्थिक संकटाची होती. यावर्षी नोंदणीचा ​​आकडा हा कोरोनाच्या आधीच्या काळाशी आता जुळत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोनानंतर नोंदणीत वाढ

कोरोनानंतर आता अनेक गोष्टी या सामान्य होत आहेत. या वर्षी महाराष्ट्रात बीटेक नोंदणीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या 2 वर्षानंतर, पदवीपूर्व व्यावसायिक शिक्षणामध्ये विशेषत: महाराष्ट्रातील BTech साठी वाढ होत आहे आणि MH-CET साठी जवळपास 1 लाखाहून अधिक नोंदणी झाली आहेत.

कोरोना महामारीनंतर महाराष्ट्रात बीटेक नोंदणी 4.04 लाखांवरून 5.03 लाख झाली. MHT CET साठी नोंदणीची अंतिम तारीख 11 मे 2022 होती. CET ने शेअर केलेल्या डेटानुसार, गेल्या वर्षी 4.04 लाख नोंदणीच्या तुलनेत सुमारे 1 लाख अधिक अभियांत्रिकी इच्छुकांनी स्टेट कॉमन एनट्रान्स टेस्टसाठी (MHT-CET) नोंदणी पूर्ण केली आहे.

रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये नोंदणीचा ​​आकडा 5.32 लाख होता तर 2019-20 मध्ये तो 4.04 लाख होता. सीईटी सेल बीटेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेबद्दल काही माहिती देखील आहे.  2021-22 शैक्षणिक वर्षात बीटेक अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 1.25 लाख होती. गेल्या वर्षी विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थी नोंदणी करू शकले नसल्यामुळे यंदा अर्जांची संख्या जास्त असेल.

कोरोना लॉकडाऊन लागू झाल्यामुळे साधारणतः मे महिन्यात घेण्यात येणारी MHT-CET परीक्षा ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आली. 2020 मध्ये, सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया मार्चमध्ये सुरू झाली परंतु उर्वरित प्रक्रिया थांबविण्यात आली. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा CET नोंदणीवर परिणाम झाला. ही प्रक्रिया जूनमध्ये सुरू झाली तर सप्टेंबरमध्ये परीक्षा झाली.

तज्ज्ञांच्या मते, 2021-22 प्लेसमेंट सीझनमध्ये नवीन आयटी-अभियांत्रिकी पदवीधरांच्या मागणीचे कारण अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मागणीत वाढ होऊ शकते. 6 वर्षांहून अधिक काळात प्रथमच, महाराष्ट्रातील बीटेक इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध जागांची संख्या 40% च्या खाली घसरली आहे आणि 2021-22 मध्ये ती 36.6% वर स्थिरावली आहे. 2020-21 आणि 2019-20 मध्ये ते अनुक्रमे 45.6% आणि 48% होती.

"आयटी-संबंधित पदवीधर कार्यक्रमांना जास्त मागणी आहे आणि शहरी भागातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या विभागांमध्ये एकही जागा रिक्त नाही. गेल्या दोन वर्षांत, नवीन आयटी पदवीधरांची अचानक मागणी वाढली आहे आणि यामुळे यावर्षी अधिक विद्यार्थी अभ्यासक्रमाकडे आकर्षित झाले आहेत" असं थडोमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालय, वांद्रेचे प्राचार्य गोपकुमारन थंपी यांनी म्हटलं आहे. 

ते पुढे म्हणाले की, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसारख्या अभ्यासक्रमांसाठी अजूनही जागा रिक्त आहेत, कम्पुटर सायन्स, आयटी, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि डेटा सायन्ससह इतर बहुतेक अभ्यासक्रमांसाठी यावर्षी सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहेत.

.महाराष्ट्रातील टॉप बीटेक कॉलेज

NIRF रँकिंग 2022 नुसार महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बीटेक महाविद्यालयांची यादी खालील प्रमाणे

NIRF ऱँकिंग 2022

महाविद्यालयाचे नाव

बीटेक फी

बीटेक सीट्स

3

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, मुंबई

9.12 लाख

1036
18

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई

3.41 लाख

355
32

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर

5.47 लाख

855
72

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे

1.62 लाख

630
119

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, (VJTI, मुंबई)

2.68 लाख540
131

भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे

4.80 लाख

1380
142

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे

7.38 लाख

1380
163

जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर

6.13 लाख

1140

 

Web Title: BTech registration rise to 24.5% in Maharashtra post-Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.