CBSE 10th, 12th Datesheet 2024: सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; इथे पहा डेटशीट...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 06:00 PM2023-12-12T18:00:26+5:302023-12-12T18:17:14+5:30
जवळपास ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची डेटशीट जारी करताना सीबीएसईने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत. जवळपास ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची डेटशीट जारी करताना सीबीएसईने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
दोन विषयांमध्ये पुरेसे अंतर असावे, इयत्ता 12वीची डेटशीट तयार करताना जेईई मेन परीक्षा लक्षात ठेवली आहे. हे टाईमटेबल तयार करताना दोन विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला होऊ नयेत, हे देखील ध्यानात ठेवण्यात आले आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10:30 पासून असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची चांगली तयारी करता यावी यासाठी परीक्षेच्या दोन महिने आधी डेटशीट जारी करण्यात आली आहे.
दहावी, बारावी परीक्षांचे टाईमटेबल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. यासाठी लेट्स्ट न्यूजवर जावे लागणार आहे. अद्याप ही लिंक ओपन झालेली नाही. तरी तुम्ही खालील ट्विटवर वेळापत्रक पाहू शकता.
CBSE releases date sheet for class 12th Board Exams. Examinations to begin from 15th February 2024. pic.twitter.com/zRePYph6ly
— ANI (@ANI) December 12, 2023
CBSE releases date sheet for class 10th Board Exams. Examinations to begin from 15th February 2024. pic.twitter.com/b1syspJ6Ut
— ANI (@ANI) December 12, 2023