CBSE 12th Result 2021: आज दुपारी २ वाजता जाहीर होणार १२ वीचे निकाल; पाहा कुठे पाहता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 11:04 AM2021-07-30T11:04:10+5:302021-07-30T11:07:33+5:30
CBSE class 12 board exam result 2021: गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक पाहत होते निकालाची वाट.
CBSE class 12 board exam result 2021: सीबीएई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर केले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक निकालांच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपले निकाल निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सवर पाहता येणार आहेत. निकाल पाहताना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एका प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अनेकांना सांभाळणं कठीण आहे. दरम्यान, दरवर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थी १२ वीच्या परीक्षा देत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बोर्डानं निकाल अंतिम करण्यासाठी मूल्यांकन योजनेचा वापर केला आहे. यावर्षी तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
CBSE Class XII Result to be announced today at 2 P.M.#ExcitementLevel %#CBSEResults#CBSEpic.twitter.com/eWf3TUGoMH
— CBSE HQ (@cbseindia29) July 30, 2021
प्रक्रिया पूर्ण
सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईटवर एक रोल नंबर फाईंडर लिंक जारी करण्यात आली आहे. त्याच्या मदतीनं विद्यार्थ्यांना आपल्या रोल नंबर शोधण्यास मदत मिळणार आहे. रोल नंबरच विद्यार्थ्यांची ओळख मानून गुण अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रवेशपत्र न मिळाल्यानं अनेक विद्यार्थ्यांना याची कल्पना नसल्याची माहिती सीबीएसईचे क्षेत्रीय प्रादेशिक संचालक रणबीर सिंह यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता cbseresults.nic.in आणि cbse.gov.in या संकेतस्थळांवर निकाल पाहायला मिळतील.