सीबीएसईचा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल वधारला

By रेश्मा शिवडेकर | Published: May 13, 2024 01:37 PM2024-05-13T13:37:29+5:302024-05-13T13:37:43+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णततेत ०.६५ टक्के इतकी वाढ झाली आहे

CBSE 12th result 87.98 percent; The result has improved compared to last year | सीबीएसईचा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल वधारला

सीबीएसईचा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल वधारला

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी, २०२४मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८७.९८ टक्के इतका लागला आहे. देशभरातून १६ लाख २१ हजार २२४ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ लाख २६ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णततेत ०.६५ टक्के इतकी वाढ झाली आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे ९१.५२ टक्के तर मुलांचा ८५.१२ टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ८९.७८ टक्के इतका लागला आहे.

बारावीची विद्यार्थी संख्या घटली
गेल्या वर्षी बारावीला १६ लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी(यंदा १६,३३,७३०) नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी (यंदा१६,२१,२२४)प्रत्यक्ष परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९,२८७ विद्यार्थ्यांची घट झाली आहे.

खासगीच्या तुलनेत सरकारी शाळांचा निकाल अधिक
सीटीएसए (सेंट्रल तिबेटियन स्कुल) - ९९.२३ टक्के
जेएनव्ही (नवोद्य) - ९८.९० टक्के
केंद्रीय विद्यालये - ९८.८१ टक्के
सरकारी अनुदानित - ९१.४२ टक्के
सरकारी - ८८.२३ टक्के
खासगी - ८७.७० टक्के

९० टक्क्यांहून अधिक गुण
देशभरात १,१६,१४५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. हे प्रमाण ७.१६ टक्के इतके आहे. तर ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे २४,०६८ विद्यार्थी असून त्यांचे प्रमाण १.४८ टक्के इतके आहे.

Web Title: CBSE 12th result 87.98 percent; The result has improved compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.