CBSE Board 10th Result 2021 LIVE: सीबीएसईचा १० वीचा निकाल जाहीर; यंदा ९९.०४ टक्के विद्यार्थी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:18 PM2021-08-03T13:18:30+5:302021-08-03T13:18:55+5:30
सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे रोल नंबर असणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे रोल नंबर नसेल तर खालील माहितीवर क्लिक करा
नवी दिल्ली – सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाईटवरून निकालाची घोषणा केली आहे. या वर्षी दहावीत एकूण ९९.०४ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता. बोर्डाने निकालाच्या घोषणेसोबतच अधिकृत वेबसाईटही चालू केली आहे.
Board Result Websites: या वेबसाईटवर निकाल पाहू शकता
cbse.gov.in
cbseresults.nic.in
Central Board of Secondary Education (CBSE) declares Class X results. pic.twitter.com/IM60NhyX7d
— ANI (@ANI) August 3, 2021
CBSE 10th Board Result 2021: निकाल पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
स्टेप 1: सर्वात आधी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर लॉग इन करा
स्टेप 2: CBSE 10th Board Result 2021 या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: याठिकाणी आवश्यक माहिती भरून द्या.
स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला CBSE 10th Board Result 2021 स्क्रीन वर दिसेल.
स्टेप 5: रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करून पुढील कामासाठी वापरू शकता.
CBSE 10th Roll Number: सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे रोल नंबर असणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे रोल नंबर नसेल तर याठिकाणी क्लिक करा
स्टेप 1: सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.
स्टेप 2: होम पेज वर, खाली दिलेल्या Roll Number Finder 2021 लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: सर्वर सिलेक्ट केल्यानंतर Continue वर क्लिक करा.
स्टेप 4: आता १० वी चा पर्याय निवडा आणि योग्य माहिती भरा
स्टेप 5: आता हे सब्मिट केल्यानंतर तुमचा रोल नंबर तुम्हाला दिसेल.
स्टेप 6: रोल नंबर डाऊनलोड करून याच माध्यमातून तुम्ही निकाल पाहू शकता.