CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, 2026 पासून नवीन धोरण लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 22:04 IST2025-02-25T22:03:53+5:302025-02-25T22:04:28+5:30
CBSE Board Exam : परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च, तर दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाईल.

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, 2026 पासून नवीन धोरण लागू
CBSE Board Exam : देशात दरवर्षी लाखो-करोडो विद्यार्थी CBSE बोर्डातून दहावीची परीक्षा देतात. यातील काही विद्यार्थी पास होतात, तर काही नापास होतात. अशा नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो. पण, आता 2026 पासून हा पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही. सीबीएसई बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने मंगळवारी त्याच्या मसुद्याला अंतिम मंजुरीही दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दुसरा टप्पा लगेच मे महिन्यात घेतला जाईल. म्हणजेच, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. CBSE नुसार, वर्षातून दोनदा होणारी इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. पण, संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन एकदाच घेण्यात येईल. विशेष म्हणजे दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच केंद्र देण्यात येणार आहे. पण, यासाठी विद्यार्थ्यांना जास्त परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
CBSE की ड्राफ्ट पॉलिसी के मुताबिक वर्ष 2026 से साल में दो बार दसवीं की बोर्ड परीक्षाएं आयोजित करने का प्रस्ताव, 2026 में पहले चरण की परीक्षा 17 फरवरी से 6 मार्च तक होगी, जबकि दूसरे चरण की परीक्षा 5 मई से 20 मई तक होगी@cbseindia29#NEPpic.twitter.com/V1UKZeSMb7
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) February 25, 2025
विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा मिळणार?
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार असेल. जर विद्यार्थी दोनदा परीक्षेला बसले, तर त्यांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल. सध्या सीबीएसईने तयार केलेल्या मसुद्यानुसार, पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे या कालावधीत होणार आहे.
शिक्षण पद्धतीत मोठा बदल
सीबीएसईच्या या मसुद्याबाबत शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या मसुद्यावर चर्चा झाली. यापूर्वी 19 फेब्रुवारीलाही मंत्रालयात बैठक झाली होती. यामध्ये CBSE, NCERT, KV मध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईच्या वेबसाइटवर शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सामान्य लोक यांच्याकडून धोरणाच्या मसुद्यावर अभिप्राय घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. हा मसुदा सीबीएसईच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. सीबीएसईच्या या मसुद्यावर 9 मार्चपर्यंत लोक आपले मत देऊ शकतात.