CBSE Term 1 Board Exam: सीबीएसई १० वी, १२ वी पहिल्या टर्मची परीक्षा जाहीर; तीन महत्वाचे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:52 PM2021-10-18T21:52:19+5:302021-10-18T21:54:24+5:30
CBSE datesheet: प्रत्येक पेपर हा 90 मार्कांचा असणार असून तो वाचण्यासाठीचा वेळ हा 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे करण्यात आला आहे.
सीबीएसईने (CBSE ) 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टर्मची परीक्षा जाहीर केली आहे. ही परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये घेतली जाणार आहे.
१२ वीची परीक्षा ही 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ती 22 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. परीक्षेचे टाईमटेबल जारी करण्यात आले आहे. प्रत्येक पेपर हा 90 मार्कांचा असणार असून तो वाचण्यासाठीचा वेळ हा 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे करण्यात आला आहे. तसेच हिवाळा असल्याने सकाळी 10.30 ऐवजी पेपर 11.30 वाजता सुरु होणार आहे.
CBSE releases the term 1 board exam 2021-2022 date sheet or timetable for Class 10 and Class 12 students
— ANI (@ANI) October 18, 2021
Term 1 exam will take place in November-December. pic.twitter.com/Qd0taPzKBV
तर दहावीची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून शेवटचा पेपर हा 11 डिसेंबरला होणार आहे. परीक्षेचे टाईमटेबल जारी करण्यात आले आहे. इथेही 12 वी परीक्षेप्रमाणेच बदल करण्यात आले आहेत.
CBSE releases the term 1 board exam 2021-2022 date sheet or timetable for Class 12 students pic.twitter.com/reRQxCWG6w
— ANI (@ANI) October 18, 2021