एसएनडीटी विद्यापीठात भारतीय ज्ञान, संस्कृत आणि योग केंद्र सुरू
By सीमा महांगडे | Published: September 21, 2022 03:31 PM2022-09-21T15:31:47+5:302022-09-21T15:32:32+5:30
भारतीय ज्ञानाची परंपरा ही शाश्वत असून ती आपण काळाप्रमाणे ओळखली पाहिजे, वापरली पाहिजे आणि तिचा वापर केला पाहिजे असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संगठन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले.
मुंबई :
भारतीय ज्ञानाची परंपरा ही शाश्वत असून ती आपण काळाप्रमाणे ओळखली पाहिजे, वापरली पाहिजे आणि तिचा वापर केला पाहिजे असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संगठन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्रत्येक विद्यापीठात भारतीय ज्ञान, संस्कृती, भारतीय भाषा आणि योगाच्या प्रगतीसाठी एक योग केंद्राची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू संकुलात भारतीय ज्ञान, संस्कृती आणि योग केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष अतिथी म्हणून अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे संचालक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. अतुल कुलकर्णी गेली ३२ वर्षे ईशान्येकडील राज्यांमध्ये समाजाच्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. क्रीडा, संस्कृती, चित्रपट, साहित्य, समाजसेवा किंवा शिक्षण अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेख भारतीय परंपरेनुसार, प्रत्येक क्षेत्रात मूलभूत बदल घडू लागले आहेत, ज्याचा किरकोळ परिणाम गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेनुसार आपल्याला संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास करायचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कुलगुरूंच्या प्रेरणेने हे केंद्र शैक्षणिक क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देईल आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार आणि सहकार्याद्वारे आणि संस्था संशोधन आणि संशोधन क्षेत्रात सतत प्रगती करेल अशी ग्वाही एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे अध्यक्ष आणि भारतीय ज्ञान केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्र कुमार तिवारी यांनी दिली.
हे केंद्र देशातील तिसरे केंद्र असून, भारतीय ज्ञानपरंपरा, साहित्याचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील पहिले केंद्र आहे. भाषा, मूल्ये आणि संस्कृती वाढवण्यासाठी केली आहे. आयआयटी कानपूर आणि आयआयटी खडगपुर येथे अशी दोन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. डॉ. उज्वला चक्रदेव म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार आपण भारतीय मूल्ये रुजवली पाहिजेत आणि परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन शोध आणि नवीन संसाधने आणली पाहिजेत, हा या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश आहे.
- उज्वला चक्रदेव, कुलगुरू, एसएनडीटी महिला विद्यापीठ