वागळे इस्टेटच्या ITI मधील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे गुणवंत प्रमाणपत्र
By सुरेश लोखंडे | Published: September 17, 2022 08:39 PM2022-09-17T20:39:19+5:302022-09-17T20:40:28+5:30
प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणगौरव
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून येथील वागळे इस्टेट मधील शासकीय ITI चा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्यांना अंतिम प्रमाणपत्राचे वाटप 'दीक्षांत समारंभा'मध्ये आज करण्यात आले. वागळे इस्टेट च्या या आयटीआयच्या दीक्षांत समारंभाला एएसबी इंटरनँशनलचे संचालक एम.वी. रावसाहेब, गनसोन इंडियाच्या अंजली फरिया, तिला इलेक्ट्रॉनिक्सच्या मानसी कुलकर्णी आदी या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रत्येक व्यवसायात प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणगौरव करण्यात आला.
जे विद्यार्थी पूर्ण संस्थेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आले त्यांचा विशेष कप देऊन योग्य तो सन्मान करण्यात आल्याचे या आयटीआयचे प्राचार्य श्याम अंबाळकर यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीचे निमित्ताने शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२२चा ७ सप्टेंबरला निकाल जाहीर झाला. निकालामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांना अंतिम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम या दिक्षांत समारंभ शनिवारी पार पडला.