दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शाळांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:25 AM2019-10-16T05:25:37+5:302019-10-16T05:25:54+5:30
मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत मुंबई विभागात शाळा आणि शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. २१ आॅक्टोबर, २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक ...
मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत मुंबई विभागात शाळा आणि शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. २१ आॅक्टोबर, २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ आॅक्टोबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
राज्यातील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी दिवाळीच्या सुट्टीतील बदलाबाबत पत्र काढले आहे, परंतु मुंबईत अद्याप दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी ठरविण्याबाबत कोणतेही पत्रक काढलेले नाही. या सोबतच शाळा पुन्हा सुरू होण्याचाही शाळांचा कालावधी निश्चित नाही. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने त्वरित निर्णय घेऊन उपसंचालक कार्यालयाने सूचना जाहीर कराव्यात आणि एकसूत्रता आणावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
दिवाळीची सुट्टी निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारती, शिक्षक परिषद यांसारख्या शिक्षक संघटना आणि शिक्षकांकडून उपसंचालक कार्यालयाला पाठपुरावा करण्यात येत आहे. लेखी आदेश मिळाल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी शक्य असल्याने शिक्षक या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
खासगी शाळांतील शिक्षकांना सुट्ट्या कमी मिळणार
दिवाळीची सुट्टी शिक्षकांना कधीपासून कधीपर्यंत मिळणार, याबाबतही शाळा व्यवस्थांमध्ये संभ्रम आहे. बºयाच शाळांमध्ये शाळा ७ नोव्हेंबरपासून सुरू केली जात आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्ट्यांमध्ये निश्चितच कपात होत असून, त्यांच्या सुट्ट्यांवर गदा येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली. अनेक खासगी शाळांमध्ये काही सणांना देण्यात येणाºया सुट्ट्यांमध्ये कपात करत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, याचा थेट परिणाम शिक्षकांच्या सुट्ट्यांवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून इतर विभागीय उपसंचालक कार्यालयाप्रमाणे शाळा महाविद्यालये एकाच दिवशी पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.