School Reopen: मुंबईत शाळांची घंटा आजपासून वाजणार; पहिली ते सातवीचे वर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 07:56 AM2021-12-15T07:56:23+5:302021-12-15T07:56:40+5:30

१६ लाख विद्यार्थी चढणार शाळेची पायरी, मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या खासगी आणि पालिकेच्या एकूण ३४२० शाळा आहेत. यात साडे दहा लाख विद्यार्थी शिकत आहेत.

Coronavirus: School Reopen in Mumbai from today; Classes I to VII start | School Reopen: मुंबईत शाळांची घंटा आजपासून वाजणार; पहिली ते सातवीचे वर्ग सुरू

School Reopen: मुंबईत शाळांची घंटा आजपासून वाजणार; पहिली ते सातवीचे वर्ग सुरू

googlenewsNext

मुंबई  :  कोरोनाच्या नव्या प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता, मुंबई विभागात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारपासून शाळा सुरू होणार आहेत. मुंबई महानगरातील जवळपास १६ लाख ३९ हजार ५७८ विद्यार्थी तब्बल २० महिन्यांनी शाळेची पायरी चढणार आहेत. 

मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे मुंबई विभागातील बहुतांश शाळांची घंटा तब्बल २० महिन्यांहून अधिकच्या काळानंतर वाजणार आहे. दरम्यान, अनेक शाळा हे वर्ग सुरू करण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी घेणार असल्या तरी शाळांना वर्ग सुरू करणे बंधनकारक असणार असल्याचे पलिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या खासगी आणि पालिकेच्या एकूण ३४२० शाळा आहेत. यात साडे दहा लाख विद्यार्थी शिकत आहेत.

नवी मुंबईत ४४० शाळा होणार सुरू
दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे नवी मुंबईतील एकूण ४४० शाळा सुरू होणार आहेत. त्यातील ७४ शाळा या महानगरपालिकेच्या असून, ३६६ शाळा खासगी आहेत.

Web Title: Coronavirus: School Reopen in Mumbai from today; Classes I to VII start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.