विदेशी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या ‘त्या’ अभ्यासक्रमांच्या पदव्या वैध नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 06:39 AM2023-12-17T06:39:48+5:302023-12-17T06:40:06+5:30
एज्युटेक कंपन्यांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने केले सतर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मान्यताप्राप्त नसलेल्या विदेशी विद्यापीठांबरोबर सहकार्य करून भारतातील एज्युटेक कंपन्या व महाविद्यालये चालवित असलेल्या अभ्यासक्रमाच्या पदव्या वैध नाहीत. त्यामुळे अशा ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केले तसेच अवैध पदवी अभ्यासक्रम चालविणे एज्युटेक कंपन्या, महाविद्यालयांनी बंद करावे, असाही इशारा दिला.
यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितले की, अनेक उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयांनी यूजीसीने मान्यता न दिलेल्या विदेशी शिक्षण संस्थांशी करार करून ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या पदव्या वैध धरल्या जाणार नाहीत. विदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना मान्यता नसेल, तर त्या अभ्यासक्रमाच्या पदव्याही अवैध ठरतात. तरीही एज्युटेक कंपन्या अशा अवैध अभ्यासक्रमांच्या जाहिराती प्रसिद्ध करत असतात, असे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे.
कारवाईचा इशारा
nवैध नसलेल्या पदव्या, डिप्लोमाचे अभ्यासक्रम ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे चालविण्यात येत आहेत, या गोष्टींची विद्यार्थी व पालक यांनी नोंद घेतली पाहिजे.
nअवैध अभ्यासक्रम चालविणाऱ्या एज्युटेक कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिला आहे.