या १५ नोकऱ्यांची मागणी कमी होणार, कोण-कोणत्या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार? बघा लिस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:29 IST2025-01-21T16:28:10+5:302025-01-21T16:29:25+5:30

नुकत्याच आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात या सेक्टर्ससंदर्भात माहिती देण्यात आली आहे...

Demand for these 15 jobs will decrease, employees in which sectors will be hit the most Check out the list | या १५ नोकऱ्यांची मागणी कमी होणार, कोण-कोणत्या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार? बघा लिस्ट!

या १५ नोकऱ्यांची मागणी कमी होणार, कोण-कोणत्या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार? बघा लिस्ट!

काळाच्या ओघात अनेक उद्योग-धंदे, नोकऱ्या, संपुष्टात येत असतात आणि त्यांची जागा इतर नवे उद्योग-धंदे आणि नोकऱ्या घेत असतात. अनेक नव्या क्षेत्रांमध्ये लोकांची मागणी वाढते. आता 2025 से 2030 या कालावधीतही काहीसे असेच होण्याची शक्यता आहे आणि काही क्षेत्रांत नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर कमी होतील.

नुकत्याच आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात या सेक्टर्ससंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर कोणत्या क्षेत्रातील लोकांसाठी येणारा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो, हे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊयात...

किती नोकऱ्या जाऊ शकतात? -
या अहवालानुसार, येणाऱ्या काही वर्षांत ९२ मिलियन नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात. तर १७० मिलियन नव्या नोकऱ्या बाजारात येतील. याच बरोबर १०९० मिलियन नोकऱ्या लेबर मार्केटमध्ये टिकून राहू शकतात. संपुष्टात येणाऱ्या 92 मिलियन नोकऱ्यांमध्ये 15 सेक्टर्समध्ये सर्वाधिक नोकऱ्या संपुष्टात येण्याची भीती आहे. जर आपणही या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर आपल्यासाठीही येणारा काळ कठीन असू शकतो. या लोकांना दुसरा पर्याय निवडण्याची आवश्यकता पडू शकते.

या क्षेत्रांमधील लोकांना सर्वाधिक धोका -
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात ज्या 15 क्षेत्रांना धोका सांगण्यात आला आहे, ती अशी... -

- कॅशियर अँड टिकीट क्लर्क
- अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टन्ट
- बिल्डिंग केअर टेकर्स, क्लिनर्स आणि हाउसकीपर्स
- स्टॉक किपिंग क्लर्क
- प्रिटिंग आणि त्याच्याशी संबंधित वर्कर्स
- अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क
- अकाउंटन्ट्स आणि ऑडिटर्स
- ट्रांसपोर्टेशन अटेंडन्ट्स आणि कंडक्टर्स
- सिक्योरिटी गार्ड्स
- बँक टेलर्स आणि त्याच्याशी संबंधित क्लर्क
- डेटा एंट्री वर्कर
- क्लायंट इंफोर्मेशन अँड कस्टमर सर्व्हिस वर्कर
- ग्राफिक डिझाइनर्स
- बिझनेस सर्व्हिसेज अँड एडमिनिस्ट्रेशन मॅनेजर्स
- इंवेस्टिगेटर्स

कुणाला असेल सर्वाधिक मांगणी? -
येणाऱ्या पाच वर्षांत टेक्निकल स्किल्स सर्वाधिक महत्वाचे ठरतील. यांत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि बिग डेटा, नेटवर्क आणि सायबर सिक्योरिटी, टेक्नॉलॉजिकल लिटरेसी, टेक्निकल स्किल्स. याशिवाय उमेदवारांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग आणि सहनशीलताही आवश्यक असेल.

Web Title: Demand for these 15 jobs will decrease, employees in which sectors will be hit the most Check out the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.