शाळा सुरू व्हायच्या आधी न विसरता खरेदी करा 'या' वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 12:02 PM2023-06-04T12:02:34+5:302023-06-04T12:03:15+5:30

शाळेच्या सुट्ट्या आता संपल्या असून सगळ्या मुलांना शाळेत जायचे वेध लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांनी खूप सारी मजा मस्ती ...

Do not forget to buy these items before school starts | शाळा सुरू व्हायच्या आधी न विसरता खरेदी करा 'या' वस्तू

शाळा सुरू व्हायच्या आधी न विसरता खरेदी करा 'या' वस्तू

googlenewsNext

शाळेच्या सुट्ट्या आता संपल्या असून सगळ्या मुलांना शाळेत जायचे वेध लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांनी खूप सारी मजा मस्ती केलेली असते. कोणी गावी फिरायला जातं, तर कोणी आपल्या पालकांसोबत एखाद्या हिल स्टेशनला जाऊन मौज मजा करतं. जून महिना म्हटला की, सगळ्याच शाळांच्या सुट्ट्या संपतात आणि मुलांना शाळेची चाहूल लागते. एक-दीड महिन्याची सुट्टी संपल्यानंतर प्रत्येकजण शाळेत जायची वाट पाहात असतो. शाळेचा पहिला दिवस हा सगळ्यांसाठी स्पेशल असतो. शाळेत पहिल्यांदाच जाणाऱ्या मुलांना नवीन शाळा, मित्रमैत्रीण, नवीन बॅग,पुस्तकं याविषयी उत्सुकता असते तर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश करणाऱ्या मुलांना आपले मित्रमैत्रीण आपल्याच वर्गात आहेत का याची उत्सुकता लागलेली असते. आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून त्यांना सुट्टीतील गंमतीजमती सांगायच्या असतात. एवढेच नव्हे तर शाळेच्या पहिल्या दिवशी आपली नवीन बॅग, वॉटर बॉटल. टीफिन, नवीन वह्या मित्रमैत्रिणींना दाखवून त्यांच्या देखील नवीन गोष्टी पाहायच्या असतात.

आजकाल मुलांची शालेय साहित्याची शॉपिंग ही इतकी जास्त असते की, शाळा सुरू व्हायच्या कित्येक दिवस आधीपासूनच पालक ही शॉपिंग करायला सुरुवात करतात. सुट्ट्या संपायच्या आधीच नवीन दप्तर, वॉटर बॅग, कंपास बॉक्स, टिफिन, टिफिन बॅग अशा मुलांच्या विविध मागण्या सुरू होतात. या सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हणजे खिशावर अतिरिक्त भार येणार याची पालकांना चांगलीच कल्पना असते. त्यामुळे हे शालेय साहित्य चांगल्या दर्जाचे आणि वाजवी दरात कुठे मिळते याची पालक शोधाशोध करायला सुरुवात करतात. कारण शाळेसाठी घेतलेल्या वस्तू या वर्षभर टिकल्याच पाहिजेत असे प्रत्येक पालकाला वाटत असते. कारण शैक्षणिक वर्ष संपायच्या आधीच वस्तू खराब झाल्या तर पालकांना शैक्षणिक साहित्यावर डबल खर्च करावा लागतो. आता पालकांना याची काहीही चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला नवीन वॅग, वॉटर बॅग, कंपास बॉक्स, टिफिन, टिफीन बॉक्स असे सगळेच उत्तम दर्जाचे शालेय साहित्य ॲमेझॉन या वेबसाईटवर वाजवी दरात उपलब्ध आहे. नवीन डिझाइन्सच्या अनेक प्रकारच्या बॅग्ज, वॉटर बॅग, टिफीन बॉक्स ॲमेझॉनच्या वेबसाईटला तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच लहान मुलांना आवडतील अशी विविध कार्टून कॅरेक्टर्स या बॅग्जवर असल्याने मुलांना हे बॅग्ज खूपच आवडतील यात काहीच शंका नाही. सध्या अनेक बॅगांमध्ये आपल्याला अत्याधुनिक फिचर्स देखील पाहायला मिळत आहेत. ॲमेझॉनवर असलेल्या टॉयशाईन किड्स बॅगपॅकला मुलांची सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. ही बॅगपॅक २० इंचाची असून त्यासोबत तुम्हाला पेन्सिल केस आणि लंच बॉक्स ठेवायला बॅग देखील मिळते. ही बॅग विविध रंगामध्ये उपलब्ध असून ही मुलगा आणि मुलगी अशा दोघांनाही आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या बॅगचे वजन खूप कमी असल्यामुळे त्याचा भार मुलांच्या पाठीवर आणि खांद्यावर येणार नाही. तसेच लहान मुलांना आवडणारे स्पीड बाईकचे त्यावर चित्र असल्याने लहान मुलांसाठी ती एकदम परफेक्ट आहे. तसेच स्कूल बॅगसोबतच विविध कार्टूनचे चित्र असलेले नोटबुक, पेन्सिल, मोठाले खोडरबर, शार्पनर अशा विविध साहित्यांनी भरलेली कंपासपेटी आपण घ्यावी असे प्रत्येक मुलाला वाटत असते. तसेच आपली कंपासपेटी, बॅग, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स अधिक आकर्षक आणि सगळ्यात युनिक असावे यासाठी आजकालची पिढी प्रयत्न करत असते. त्यामुळे अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या कंपासपेटी, बॅग, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. त्यामुळे ॲमेझॉनच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर काय घेऊ नि काय नको अशी तुमची अवस्था होणार यात काहीच शंका नाही.

आजकाल शाळेत अभ्यास, खेळ यासोबतच मुलांच्या क्रिएटिव्हिटीला देखील तितकेच महत्त्व दिले जाते. शाळेत हस्तकलेच्या विषयासाठी तुम्हाला सतत विविध प्रकारचे कागद, क्रॉफ्ट विकत घ्यावे लागतात. हाच हस्तकलेसाठी लागणारा संपूर्ण क्रॉफ्ट किट ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. इमॅजिनमेक फाईव्ह इन वन हा क्राफ्ट मुलांसाठी अतिशय उपयुक्त असून कमी दरात अनेक गोष्टी या किटमध्ये तुम्हाला मिळतात. हा किट सहा ते आठ वर्षांच्या मुलांसाठी अगदी योग्य असून त्यात हस्तकलेसाठी लागणारे सगळेच साहित्य उपलब्ध आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

आजकाल सगळ्याच शाळांमध्ये अभ्यासासोबतच मुलांच्या इतर छंदांनादेखील महत्त्व दिले जाते. तुमच्या मुलाचा आवडता विषय कोणता आहे, त्याला कोणत्या गोष्टीची जास्त आवड आहे हे ओळखून तुम्ही मुलांना शैक्षणिक साहित्यासोबतच विविध गिफ्टदेखील देऊ शकता. तुमच्या मुलाला विज्ञानाची आवड असेल तर विज्ञानाची सगळी माहिती असणारा किट ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.

तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे. गेल्या काही दशकांत मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप सोबतच मुलांमध्ये टॅबची देखील क्रेझ वाढत आहे. या टॅबलेटची लहान मुलांच्या अभ्यासात खूप मदत होत आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप हे प्रचंड महाग असतात. त्यामुळे ते प्रत्येकाला परवडतीलच असे नाही. त्यामुळे आजकाल पालक मुलांसाठी कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपऐवजी टॅबलेटचा विचार करू लागले आहेत. टॅबलेटचे दर हे वाजवी असल्याने पालकांसाठी हे विकत घेणे अधिक सोयीस्कर ठरतात. या टॅबेलट्समध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉपचे देखील फिचर मिळतात. त्यामुळे टॅबलेटद्वारे तुम्ही तुमच्या मुलाशी संवाद देखील साधू शकता आणि सतत तुमच्या मुलाच्या संपर्कात राहू शकता. स्टोरिओ किड्स टॉईजच्या (८.५ इंचच्या टॅबलेटला सध्या मुलांची चांगली पसंती मिळत आहे. या टॅब्समध्ये असलेल्या विविध फिचरमुळे मुलं या टॅब्सकडे आकर्षित झाली आहेत. टॅबचा रॅम आणि रोम जबरदस्त असल्याने या टॅबलेटची मेमरी खूपच चांगली आहे. तसेच डिझाइनच्या बाबतीत देखील हे टॅबलेट आकर्षक असल्याने मुलांना हे प्रचंड आवडत आहेत यात काही शंकाच नाही. हे टॅबलेट विविध रंगात उपलब्ध असल्याने मुलगा आणि मुलगी दोघेही या टॅबलेटच्या प्रेमात पडले आहेत. तुम्ही तुमच्या मुलाचे  शैक्षणिक वर्षं सुरू व्हायच्या आधी तुमच्या मुलाला हे टॅबलेट गिफ्ट म्हणून देऊ शकता. तसेच तुमच्या जवळच्या एखाद्या लहान मुलाच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी देखील हा टॅबलेट अगदी योग्य आहे. टॅबलेट हा आकाराने लॅपटॉपपेक्षा लहान आणि मोबाईलपेक्षा मोठा असतो. त्यामुळे हा हाताळणे देखील सोपा असतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या प्रवासाला जात असाल तरी मुलं टॅबलेट सोबत घेऊन येऊ शकतात आणि प्रवासाच्या दरम्यान देखील अभ्यास करू शकतात. पूर्वी शैक्षणिक साहित्यात पुस्तकं, पेन्सिल, पेन यांसारखेच साहित्य खरेदी केले जात होते. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत तुमच्या मुलासाठी या सगळ्या साहित्यांसोबतच टॅबलेट घेणं देखील गरजेचे आहे.

Amazon च्या साईट वर जाऊन खरेदी करण्यासाठी क्लिक करा - https://www.amazon.in/b/?ie=UTF8&node=4149807031

Web Title: Do not forget to buy these items before school starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.