संशोधन करा, ‘डॉक्टर’ बना; देशभरातील विद्यापीठांत रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 06:17 AM2023-05-02T06:17:00+5:302023-05-02T06:17:33+5:30
महिलांचे प्रमाण लक्षणीय : ई ॲण्ड टीमध्ये २०२०-२१ मध्ये ५६,६२५ जणांनी पीएच.डीसाठी प्रवेश घेतला.
देशात पीएच.डी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. २०१६-१७ नंतर पीएच.डी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात सामान्य पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांच्या तुलनेत इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी (इ ॲण्ड टी) या विषयात पीएच.डी करण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. यानंतर, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांना पसंती दिसते.
महिलांचे प्रमाण लक्षणीय : ई ॲण्ड टीमध्ये २०२०-२१ मध्ये ५६,६२५ जणांनी पीएच.डीसाठी प्रवेश घेतला. यात ३३.३ टक्के महिला होत्या. ई ॲण्ड टीचे २१ उपविषय आहेत. विज्ञान विषयात गणित, रसायनशास्र, भौतिकशास्त्र आदी १७ उपविषय आहेत. यात एकूण ४८,६०० जणांनी पीएच.डीसाठी प्रवेश घेतला. ज्यात ४८.८ टक्के महिला होत्या. अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) यांच्या अहवालानुसार, २०२० मध्ये एकूण २५,५५० जणांना पीएच.डी प्रदान केली. यात १४,४२२ पुरुष, तर ११,१२८ महिला होत्या.