टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:55 AM2023-02-21T05:55:00+5:302023-02-21T05:55:18+5:30

मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल.

Don't take tension..! counseling services for students; Call and ask questions... | टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा...

टेन्शन घेऊ नका..! विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा; फोन करा आणि प्रश्न विचारा...

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत होणार आहेत. या परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल. या हेल्पलाइनवर समुपदेशकांचे मदत व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च व माध्यमिक शिक्षण मुंबई मंडळाचे विभागीय सचिव डॉ सुभाष बोरसे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे केले आहे.

कार्यालयीन नियुक्त अधिकारी 
 डॉ. ज्योती परिहार (सहसचिव) ७७५७०८९०८७ दहावी / बारावी
गीता तोरस्कर (वरिष्ठ अधीक्षक) ७०२१३२५८७९ दहावीसाठी
सुप्रिया मोरे (वरिष्ठ अधीक्षक) ९८१९१३६१९९ दहावी / बारावी
सुवर्णा तारी (वरिष्ठ अधीक्षक) ९९८७१७४२२७ फक्त बारावी

बहिर्गत समुपदेशकांचे नाव 
स्नेहा अजित चव्हाण - ८३६९०१५०१३
श्रीकांत शिनगारे - ९८६९६३४७६५
शेख अखलाक अहमद अ. रज्जाक - ९९६७३२९३७०
मुरलीधर मोरे- ७९७७९१९८५०
शैलजा मुळ्ये- ९८२०६४६११५
उज्ज्वला झरे - ९९२०१२५८२७
अशोक सरोदे - ९३२२५२७०७६
चंद्रकांत ज. मुंढे - ८१६९६९९२०४
हयाळीज बी.के.- ९४२३९४७२६६
अनिलकुमार दि. गाढे -९९६९०३८०२०

Web Title: Don't take tension..! counseling services for students; Call and ask questions...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.