शिक्षणही घ्या अन् दिवसाला ८ हजार कमवा; US मधील भारतीयांसाठी टॉप ५ पार्ट टाईम जॉब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:26 IST2025-03-07T11:25:09+5:302025-03-07T11:26:50+5:30

दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जातात, काही स्कॉलरशिपमधून परदेशी शिक्षण घेतात. त्या सर्वाना पार्ट टाईम जॉब करण्याची परवानगी असते.

Earn 8000 per day along with education; Top 5 part-time jobs for Indian students in US | शिक्षणही घ्या अन् दिवसाला ८ हजार कमवा; US मधील भारतीयांसाठी टॉप ५ पार्ट टाईम जॉब

शिक्षणही घ्या अन् दिवसाला ८ हजार कमवा; US मधील भारतीयांसाठी टॉप ५ पार्ट टाईम जॉब

अमेरिकेत शिक्षण घेणे खूप जास्त खर्चिक आहे. त्यामुळे याठिकाणी भारतीय विद्यार्थी पार्ट टाईम जॉबही करतात. स्टूडेंट व्हिसाने अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना आठवड्याला २० तास काम करण्याची परवानगी असते. बहुतांश विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच पार्ट टाईम जॉब करण्याची परवानगी मिळते. त्यात चांगली गोष्ट म्हणजे कॅम्पसमध्ये मिळणाऱ्या पार्ट टाईम जॉबमधून शिक्षणासोबतच चांगली कमाईही होते. अमेरिकेतील टॉप ५ पार्ट टाईम जॉब्स कोणते जे भारतीय विद्यार्थी करू शकतात, चला जाणून घेऊया. 

लायब्रेरी पेज

जर तुम्हाला पुस्तक वाचण्याचा छंद आहे आणि शांतताही आवडते तर लायब्रेरी पेजची नोकरी तुमच्यासाठी बेस्ट आहे. या पार्ट टाईम जॉबसाठी तुम्हाला लायब्रेरियन  आणि लायब्रेरी स्टाफच्या वेगवेगळ्या टास्कमध्ये मदत करावी लागेल. विद्यार्थ्यांना पुस्तक शोधून देण्यास मदत करावी लागेल. लायब्रेरीत होणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करावे लागेल. या कामासाठी तुम्हाला प्रतितास १४.४४ डॉलर म्हणजे १२५४ रूपये मिळतील. तुम्ही येथे रोज करून ५ हजारांची कमाई करू शकता. 

टीचर असिस्टेंट

टीचर असिस्टेंट म्हणून काम केल्यास तुम्हाला कुठल्याही विषयाच्या खोलापर्यंत जाऊन तो समजून घेण्याची संधी मिळते. त्याशिवाय तुमचा बायोडटा मजबूत होतो. असिस्टेंट म्हणून तुम्हाला सेमिनारमध्ये मदत करावी लागते. लॅब सेशनचं आयोजन करावे लागते. प्रोफेसर्सला त्यांच्या कामात हेल्प करावं लागते. तुम्हाला फॅक्टलटी मेंबर्ससोबतही काम करण्याची संधी मिळते. टीचर असिस्टेंट म्हणून प्रतितास १६.७८ डॉलर म्हणजे १४५७ रूपये कमाई होऊ शकतो, यातून तुम्ही दिवसाला ५८०० रूपये कमावू शकता. 

रिटेल सेल्स असोसिएट

जर तुम्हाला लोकांची मदत करायला आवडत असेल तर तुम्ही रिटेल सेल्स असोसिएट म्हणून काम करू शकता. या जॉबमध्ये तुम्हाला ग्राहकांची शॉपिंग करण्यात मदत करावी लागेल. सेल्स, रिटर्न आणि एक्सचेंज व्यवहार पाहू शकता. स्टोअर ऑर्गेनाइज ठेवू शकता. काही रिटेल जॉब्समध्ये डिस्काऊंटही मिळते. या पार्ट टाईम जॉबमध्ये तुम्ही प्रतितास १५.३५ डॉलर म्हणजे १३३३ रूपये कमावू शकता. याठिकाणी तुम्ही रोज काम केल्यास ५३०० रूपये कमाई होईल.

प्रोडेक्शन असिस्टेंट

इव्हेंट मॅनेजमेंट आणि नेटवर्किंगमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रोडेक्शन असिस्टेंट म्हणून जॉब करणे परफेक्ट राहील. त्यातून कॅम्पस लाईफचा भाग होता येईल. या पार्ट टाईम जॉबमधून कॅम्पसमधील इव्हेंट आणि टेक्निकल सर्व्हिस मॅनेज करण्याची संधी मिळेल. कॅम्पसमध्ये होणारे कार्यक्रम आयोजित करू शकता. प्रोडेक्शन असिस्टेंट म्हणून तुम्हाला प्रतितास १८.०१ डॉलर म्हणजे १५६४ रूपये कमाई होईल. या कामातून तुम्ही दिवसाला ६२०० रूपये कमाई करू शकता. 

ट्यूरर

जर तुम्ही एखाद्या विषयात खूप हुशार असाल आणि दुसऱ्याची मदत करायला आवडत असेल तर तुम्ही ट्यूरर म्हणून पार्ट टाईम जॉब करू शकता. ट्यूरर म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवावे लागेल. स्टडी मटेरियल तयार करावे लागतील आणि क्लास घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके, रिपोर्ट कुठून घेऊ शकतात त्याची माहिती द्यावी लागेल. ट्यूरर म्हणून प्रतितास २३.७८ डॉलर म्हणजे २०६६ रूपये कमाई होते. या पार्ट टाईम जॉबमधून दिवसाला ८ हजारांची कमाई करू शकता. 

Web Title: Earn 8000 per day along with education; Top 5 part-time jobs for Indian students in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.