Education: इयत्ता पहिली ते आठवीसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:38 AM2021-08-06T09:38:16+5:302021-08-06T09:40:34+5:30

Education News: कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

Education: Doordarshan educational programs for class I to VIII | Education: इयत्ता पहिली ते आठवीसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम

Education: इयत्ता पहिली ते आठवीसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम

Next

मुंबई : कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
कोरोना काळात मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी विशेष अडचण येत असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी सरकारला पर्याय शोधण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि अनमप्रेम यांनी  उच्च न्यायालयात दाखल केली  आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

विशेष विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व समर्पित शैक्षणिक वहिनी सुरू करण्याची व रेडिओवर टॉक शो घेण्याची सूचना गेल्या आठवड्यात न्यायालयाने सरकारला केली होती. गुरुवारच्या सुनावणीत सरकारी वकील रीना साळुंके यांनी न्यायालयाला सांगितले की, डीडी सह्याद्रीवर ज्ञानगंगा म्हणून शैक्षणिक कार्यक्रम चालविण्यात येतो. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हा कार्यक्रम केवळ इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, बधिर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. 

वेळ निश्चित करण्यास सांगितले 
सामाजिक न्याय विभागाने दूरदर्शनला बधिर विद्यार्थ्यांसाठी एक वेळ निश्चित करण्यास सांगितले आहे, तसेच शिक्षण विभाग इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाचप्रकारे शैक्षणिक कार्यक्रम एका महिन्यात सुरू करणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

Web Title: Education: Doordarshan educational programs for class I to VIII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.