Varsha Gaikwad: मोठी बातमी! राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची मुलाखत; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 09:13 AM2021-09-03T09:13:07+5:302021-09-03T09:14:16+5:30

Varsha Gaikwad: शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या एकूण अर्जांमधून ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस

Education Minister Varsha Gaikwad announce recommendation of 3902 candidate for 2062 posts | Varsha Gaikwad: मोठी बातमी! राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची मुलाखत; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Varsha Gaikwad: मोठी बातमी! राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची मुलाखत; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

Varsha Gaikwad: राज्याच्या शिक्षण विभागात एकूण २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या एकूण अर्जांमधून ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षक भरतीच्या प्रक्रियेबाबतचं एक ट्विट गायकवाड यांनी केलं आहे. 

"पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खासगी व्यवस्थापनाच्या २०६१ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!", अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिली आहे. 

राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हाजर अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षण विभागाकडून टप्प्याटप्यानं या जागा भरल्या जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ८ जुलै रोजी दिली होती. 

Web Title: Education Minister Varsha Gaikwad announce recommendation of 3902 candidate for 2062 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.